Crop Insurance 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2023 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 75% पिक विमा साठी राज्य शासनाने 16 जिल्हे पात्र केले आहेत त्यामध्ये जवळपास 35 लाख शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यावर 1700.73 कोटी रुपयांची रक्कम डीबीटी द्वारे 31 मार्च 2024 पर्यंत ट्रान्सफर केल्या जाईल.
शेतकऱ्यांचे पिकांवर अतिवृष्टीमुळे आणि त्याबरोबरच ऑगस्टमध्ये पडलेल्या 21 दिवसापेक्षा जास्त पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांची पीक जागेवरच जिरून गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 50% पिकांचे उत्पादन जागेवर सोडून द्यावा लागलं. ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा भरलेला होता अशाच शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये 25% पिक विमा भेटलेला होता. यासाठी जवळजवळ 2200 कोटी अग्रीम पीक विम्याचे डीबीटी द्वारे वाटप केल्या गेले होते. आता सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचे वितरण कधी होईल याची माहिती दिली आहे तर चला आपण सर्व माहिती पाहून घेऊया.
75% खरीप पिक विमा मंजूर
शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यामध्ये शेतकऱ्यांच 50% पेक्षा जास्त पिकांची उत्पादन घटले होते आणि त्याबरोबरच दिवाळीनंतर झालेल्या अतुष्टीमुळे जे पीक आले होते ते सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेले त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा क्रॉप इन्शुरन्स मिळणार आहे. दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे राज्यातील जवळजवळ 24 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रीम पिक विमा जाहीर करण्यात आला होता. यासाठी जवळजवळ 50 लाख 95 हजार शेतकरी पात्र होते ज्यांच्यासाठी 226 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि तो दिवाळीमध्ये वाटपही करण्यात आला. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 75% पीक विम्याचा जीआर घोषित केलेला आहे. हा 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार आहे याबद्दल थोडी माहिती दिली आहे.
75% खरीप पिक विमा कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पिक विमा योजना. जी शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीपासून जसे की अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वादळ, गारपीट, पाऊस इत्यादी गोष्टी पासून नुकसान झाल्यास महाराष्ट्र सरकार पिक विमा भरपाई करून देत असते. 2023 यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा काढला होता अशा सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा आणि 75% अग्रीम पिक विमा मिळणार आहे. आता नवीन जीआर नुसार जवळजवळ 35 लाख शेतकरी 75% पिक विमा साठी पात्र आहेत.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.02/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate
राज्य सरकारने एक जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये 16 जिल्हे पात्र आहेत. ज्यामधील जवळपास 35 लाख शेतकरी पात्र असून त्यांना 1700.73 कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो हा 75% खरीप पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 फेब्रुवारीपासून वाटपास सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांना हे तरी जवळपास 27 हजार रुपये मिळणार आहेत.
जर तुम्हाला 16 जिल्ह्याची यादी पाहायची असेल तर येथे क्लिक करा
3 thoughts on “उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार? 75% पिक विमा वाटप मोठी अपडेट, Crop Insurance 2023”