Maharashtra Budget 2024: नमस्कार शेतकरी बांधवांनो, दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी राज्य शासनाने पीएम कुसुम योजनेची सुरुवात केली होती. या अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत लाखो सौर कृषी पंप वितरित केले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खूपच फायदा होत आहे. कारण या अगोदर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पूर्णपणे गावातील लाईटवर अवलंबून राहावं लागत होतं आणि यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठे प्रॉब्लेम होत होते. त्यामध्ये वेळेवर लाईट येत नसेल. डीपी खराब होत असे, शेतकरी इलेक्ट्रिसिटी बिल भरत नसेल अशा गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा सिंचन शक्य होत नव्हतं आणि पिकांचे नुकसान दिवसेंदिवस होत. परंतु आता सौर कृषी पंप योजनेमुळे ही अडचण शेतकऱ्यांची दूर झाली आहे. यंदा महाऊर्जेला 8 लाख 60 हजार सौर कृषी पंप बसवण्याकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी आढळल्या, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यावर एक चांगला निर्णय घेतला आहे. तो म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. तर चला यामध्ये राज्य सरकारने काय काय निर्णय घेतले आहे याबद्दल चर्चा करूया.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
27 फेब्रुवारी 2019 रोजी विधानसभेत झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मागे त्याला कृषी पंप या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप वितरित करण्याचे आव्हान सुद्धा त्यांनी केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे पुढील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोगाला येईल मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लवकरच अर्ज नोंदणी सुद्धा सुरू करण्यात येईल यासाठी सर्व प्रोसेस पीएम कुसुम सोलर योजना सारखीच होईल.
शेतकरी मित्रांनो यंदा पीएम कुसुम योजना अंतर्गत एक लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी शासनाने/ महाऊर्जेने खूप खूप बेजार होऊन आतापर्यंत जवळपास 78 हजार 757 सौर कृषी पंप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवली आहे. मित्रांनो महाऊर्जेला जवळपास 8 लाख 60 हजार हजार शेतकऱ्यांच्या सौर कृषी पंपसाठी नोंदण्या आढळल्या आहेत त्यामुळे शासनाने यावर एक चांगलाच निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळतील.
आजच्या कापूस भावात धुमाकूळ गाठला ८ हजाराचा टप्पा! जिल्ह्यानुसार पावत्या पहा, Cotton Rate
शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी जास्तीत जास्त पारंपारिक अपारंपारिक ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्रशासन आणि राज्य शासन प्रयत्न करीत आहे यासाठी शासनाने सूर्य घर योजना, रूप टॉप सोलर योजना याकरिता अनुदान देण्यास सुरुवात केलेली आहे यासाठी शेतकऱ्यांना अल्लागार त्यांना जवळपास 78 हजार रुपये एवढे अनुदान शासन देत आहे या सर्व योजनांकरिता पुढील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार असे म्हटले.
2 thoughts on “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024”