Drip Irrigation 80% Subsidy नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त योजना घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत तुम्हाला ठिबक व तुषार सिंचनाला 80% अनुदान/ सबसिडी मिळणार आहे. यासोबतच या योजनेअंतर्गत तुम्हाला मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर, विविध कृषी सिंचनाचे साधन या सुद्धा योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75% ते 80% अनुदान दिले जाईल. मित्रांनो ही योजना 2019 पासून राबवल्या जात आहे. या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाईल? कोणाला अनुदान दिले जाईल? याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तर चला पाहूया सर्व काही.
ठिबक व तुषार सिंचनाला मिळणार 80% अनुदान
राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार आहे. व तसेच भूधारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी 75% अनुदान दिले जाईल. मित्रांनो यावर्षी म्हणजे 2023-2024 करिता झालेल्या अर्थसंकल्पीत नवीन जीआर घोषित करण्यात आला. ज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरिता 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला वैयक्तिक शेततळे किंवा वैयक्तिक विहीर मिळेल.
पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024
उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार? 75% पिक विमा वाटप मोठी अपडेट, Crop Insurance 2023
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
मित्रांनो 2023-2024 या वर्षाकरिता 350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु अद्याप देखील निधीचं मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात नाही आलं. यामुळे शेतकऱ्यांना या 55% च्या व्यतिरिक्त ठिबक सिंचन, तुषार सिंचन अनुदान मिळालं नव्हतं यामुळे शेतकऱ्यांचा या योजने पासून विश्वास उडाला होता. शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की या योजनेअंतर्गत फक्त 55% अनुदान मिळतं. मित्रांनो या योजनेअंतर्गत जे शेतकरी ठिबक सिंचन अनुदानास पात्र होतात त्यामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25% आणि भूधारक शेतकऱ्यांना 30% अनुदान दिले जाते. शेततळ्याचा अस्तरीकरण मागेल त्याला शेततळ्याच्या अंतर्गत 75 हजार रुपयांचा हे अनुदान देखील दिले जातं.
4 thoughts on “ठिबक व तुषार सिंचनाला मिळणार 80% अनुदान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, Drip Irrigation 80% Subsidy”