PM Suryaghar scheme 2024 मित्रांनो पीएम सूर्य घर योजना अर्थात रूप-टॉप योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी राबवल्या जाणाऱ्या नवीन योजने संदर्भातील एक अतिशय दिलासादायक अपडेट देण्यात आल आहे. मित्रांनो 29 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देशांमध्ये पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी देण्यात आली होती आणि याच्यासाठी 75 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो एकंदरीत पाहिले तर 13 फेब्रुवारी रोजी या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घोषणा करण्यात आली होती आणि याच योजनेअंतर्गत देशातील एक कोटी लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 75 हजार 21 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असणार आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत 2 किलोवॅट क्षमतेच्या पॅनल साठी 60% अनुदान, 2-3 किलोवॅट क्षमतेच्या पॅनल साठी 40% दिली जाणार आहे. अर्थात 1 किलो वॅटच्या पॅनल साठी 30 हजार रुपये अनुदान, 2 किलो वॅट पर्यंत 60 हजार रुपये आणि 3 किलो वॅट पॅनलच्या क्षमतेसाठी 78 हजार रुपयांचा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे.
पीएम सूर्य घर योजना अनुदान
मित्रांनो पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत जर लाभार्थ्याकडे हिसा भरण्यासाठी निधीची उपलब्धता नसेल तर लाभार्थ्याला 60% एवढ्या अल्प दराने तारण मुक्त कर्ज देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जर मित्रांनो लाभार्थ्याकडे 130 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध असेल तर त्या लाभार्थ्याला 1 किलो वॅट पर्यंतचा सोलर पॅनल उभारता येतो. ज्याच्यासाठी जो खर्च असेल तो 50 हजार रुपये एवढा असेल आणि यासाठी जवळजवळ 30,000 हजार रुपये एवढी सबसिडी मिळणार आहे. 1 किलो वॅट सोलर पॅनलच्या माध्यमातून जवळपास 4.32kwh/day एवढी विजेची निर्मिती होते.
उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार? 75% पिक विमा वाटप मोठी अपडेट, Crop Insurance 2023
जर लाभार्थ्याकडे 200 स्क्वेअर फुट एवढी शिल्लक जागा असेल तर त्या लाभार्थ्याला 2 किलो वॅटचा सोलर पॅनल मिळेल आणि प्रोजेक्टचा खर्च जवळपास 1 लाख रुपये पर्यंत येणार आहे. 2 किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी शासनाकडून 40,000 हजार रुपयांचा अनुदान मिळणार आहे. 2 किलो वॅटच्या सोलर पॅनल पासून 8.64kwh/day एवढी विजेची निर्मिती होते.
जर लाभार्थ्याकडे 300 स्क्वेअर फुट एवढी शिल्लक जागा असेल तर त्याला 3 किलो वॅटचा सोलार पॅनल मिळेल आणि या प्रोजेक्टसाठी जवळपास 1 लाख 45 हजार रुपये लागतील. 3 किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी शासनाकडून 78 हजार रुपयांचा सबसिडी मिळणार आहे. या 3 किलो वॅटच्या सोलर पॅनल पासून 12.96kwh/day एवढी विजेची निर्मिती होते.
पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा
मित्रांनो जर तुम्हाला सूर्य घर योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हिडिओला क्लिक करा आणि संपूर्ण माहिती पाहून सूर्य घर योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन घरबसल्या तुम्ही अर्ज करा.
2 thoughts on “पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024”