Today cotton Rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणती बाजार समिती कापसाला सर्वोच्च बाजार भाव देत आहे. याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो मागच्या हप्त्यापासून कापसाचे दर हे वाढलेले दिसून येत आहेत आणि हे दर जवळजवळ 8000 हजार पेक्षा जास्त झालेली आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्वासात श्वास घेतलेला आहे. शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी मोलाची गोष्ट आहे की कापसाला यावर्षी 8000 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मागच्या वर्षी कापसाला चांगला भाव न मिळाल्याने महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला भाव घरातच साठवून ठेवला. पण शेतकऱ्यांनी आता खरोखर कापूस विकायला काढण्याची वेळ आलेली आहे. सध्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला खूप चांगला भाव मिळत आहे. केंद्र शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा जास्त बाजार भाव आता आपल्याला लागत आहे. याचं कारण म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये कापूस घेण्यासाठी लागलेली शर्यत होय.
आजचे कापसाचे बाजार भाव दि.02/03/2024
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितीमध्ये कापसाचे भाव हे स्थिर आहेत. परंतु काही बाजार समितीमध्ये आपल्याला चढ-उतार दिसून येत आहे. जसे की देऊळगाव राजा आणि मानवत येथे कधी भाव अचानक वाढतो. तर कधी भाव कमी होतो. देऊळगाव राजा येथे काल प्रतिक्विंटल कापसाला जास्तीत जास्त 8000 हजार रुपये भाव भेटला आहे. मानवत येथे कापसाला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 7850 रुपये दर भेटला आहे आणि मग त्यानंतर अकोला येथे कापसाला प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर हा 7800 मिळाला आहे. तर चला खाली दिलेल्या टेबल नुसार सर्व काही माहिती वाचून घ्यावी. जेणेकरून तुम्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त भाव लागला आहे ते कळून जाईल.
कापसाचे कालचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
मानवत | 7850 रु. |
देऊळगाव राजा | 8000 रु. |
अकोला | 7800 रु. |
अकोला (बोरगाव मंजू) | 7800 रु. |
राळेगाव | 7580 रु. |
उमरेड | 7350 रु. |
वारोरा माढेली | 7501 रु. |
नेर परसोपंत | 6500 रु. |
काटोल | 7200 रु. |
यावल | 7150 रु. |
सिदी (सेलू) | 7625 रु. |
फुलंब्री | 7200 रु. |
Today cotton Rate
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला दर मिळत आहे. तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ 3 बाजार समितीमध्ये कापसाला जबरदस्त भाव मिळत आहे. त्या बाजार समितीमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समिती, देऊळगाव राजा बाजार समिती आणि परभणी येथील मानवत बाजार समिती या तीन बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च भाव लागत आहे. शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यातील बाजार समिती विसरली असेल तर मला माफ करा. या तीनही बाजार समितीमध्ये यंदा कापसाला या हप्त्यामध्ये 8000 हजार पेक्षा जास्त जास्तीत जास्त भाव दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या बाजार समितीमध्ये कापूस विकायची इच्छा होत आहे. शेतकऱ्यांनी वर दिलेल्या टेबल नुसार तुम्ही पाहिलंच असेल की कोणत्या बाजार समितीमध्ये किती दर लागतो.
सरकारद्वारे चालू केलेल्या नवीन योजना पहा–
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024
2 thoughts on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.02/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate”