नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता, नमो शेतकरी योजना 2रा हप्ता कधी मिळणार तारीख पहा, एकूण 6000 मिळणार, Namo Shetkari Yojana 2nd Installment

Namo Shetkari Yojana 2nd Installment नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत आणि त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा 3रा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कधी भेटणार याबद्दलही माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला हे माहिती असेल की नमो शेतकरी योजना अंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी राज्य शासनाने जवळपास 1792 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.

नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता

नमो शेतकरी योजना सुरू होऊन कम्प्लीट एक वर्ष होत आहे. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा 28 ऑक्टोबर 2023 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला गेला होता. मित्रांनो नमो शेतकरी योजनेची घोषणाही लवकरच झाली होती परंतु नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना खूप उशिरा मिळाला. त्यामुळे मित्रांनो या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता याच महिन्यात मिळणार आहे. तर तो हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तारीख सांगितली आहे तर चला जाणून घेऊया सर्व काही.

नमो शेतकरी योजनेची येथे क्लिक करून यादी पहा

नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी मिळणार ?

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 हजार रुपये वितरित केल्या जाणार आहे. अगदी केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणे ही पण योजना राज्य शासन राबवत आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचविणे आणि शेतीला प्रामुख्य देणे. शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जवळपास 1792 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जवळपास 90 लाख शेतकरी पात्र असून त्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 हजार रुपये हे 28 फेब्रुवारी ला वितरित करण्यात येणार आहेत.

नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी मिळणार ?

जर शेतकऱ्याचे बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी तारखेला पैसे जमा झाले नाही तर कृषीमंत्र्याच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी आखरीपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांचे खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 2रा व 3रा हप्ता जमा होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण नमो शेतकरी योजनेचे 4,000 हजार रुपये जमा होणार आहेत. आणि त्यासोबतच पी एम किसान योजनेचा 16वा हप्ता सुद्धा 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार आहे. तर एकूण शेतकऱ्यांना 6,000 हजार रुपये राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून मिळणार आहे.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा, लाईव्ह हवामान अंदाज आजचा, मराठवाडा-विदर्भातील या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज, Punjab Dakh Weather Forecast Today

Cotton Rate Today आजचे कापूस भाव लाईव्ह, संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कापुस भाव, पहा लवकर यादी

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार योजनांचे पैसे

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार योजनांचे पैसे

शेतकरी मित्रांनो 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यात येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 2रा व 3रा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण शेतकऱ्यांना एकाच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी 6000 हजार रुपये मिळणार आहे.

2 thoughts on “नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता, नमो शेतकरी योजना 2रा हप्ता कधी मिळणार तारीख पहा, एकूण 6000 मिळणार, Namo Shetkari Yojana 2nd Installment”

Leave a comment

Exit mobile version