पंजाब डख हवामान अंदाज आजचा, लाईव्ह हवामान अंदाज आजचा, मराठवाडा-विदर्भातील या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज, Punjab Dakh Weather Forecast Today

Punjab Dakh Weather Forecast Today नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या पुन्हा पावसाचे वातावरण राज्यामध्ये गुरमाळत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची हीच तळमळ आहे की शेती पिकांची काही नुकसान होते की काय? शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा घाबरून जात आहेत. कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्या उन्हाळी पीक घेतल्या जात आहे. ज्यामध्ये भुईमूग, चना, गहू, जवारी इत्यादी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या भीती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना वाटत आहे की पुन्हा गारपिटीने नुकसान होते की काय? तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सर्व डिटेल माहितीबद्दल सांगणार आहोत. राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस होणार आहे? आणि सर्वात कमी कुठे पाऊस होणार आहे? याबद्दल आपण बोलणार आहोत तर चला सुरू करूया.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा

पंजाब डख हवामान अंदाज आजचा

राज्याच्या काही भागांमध्ये रविवारपासून 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक पावसाचा येल्लो अलर्ट हवामान अभ्यासक पंजाब डख आणि हवामान विभागाने दिला आहे. तर मित्रांनो ते जिल्हे नेमके कोणते आहेत चला त्यांच्याबद्दल बोलूया. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस सांगितलेला आहे. त्याबरोबरच नांदेड जिल्ह्यामध्ये रविवारी आणि सोमवारी विजा आणि ढगांचे वातावरणाचा हलक्या पावसाची येल्लो अलर्ट हवामान विभागाने नोंदवला आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वारं वाहीन याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची नोंद दाखवली आहे. लातूर जिल्ह्यात मध्ये रविवारी आणि मंगळवारी. धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

पंजाब डख हवामान अंदाज, मराठवाडा-विदर्भ धो धो पाऊस पडणार, Punjab Dakh Weather Forecast

PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार? तारीख पहा, PM Kisan 16th installment

लाईव्ह हवामान अंदाज आजचा

लाईव्ह हवामान अंदाज आजचा

संपूर्ण विदर्भामध्ये आजपासून पुढील 5 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती अकोला, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सोमवार आणि मंगळवारी काही ठिकाणी विजा आणि ढगाळ वातावरणाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने नोंदवला आहे. तसेच सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. हा होता हवामान अंदाज अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाईटला दररोज भेटत जा.

Leave a comment

Exit mobile version