Lek Ladki Yojana नमस्कार मित्रांनो राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून स्थापित करण्यात आलेली आहे. मित्रांनो लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे. ही योजना फक्त त्याच कुटुंबातील मुलींना असेल ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड असेल. मुलीच्या जन्मानंतर मुलीला टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल आणि जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा मुलीला 75 हजार रुपये रोख मिळतील. मित्रांनो ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. याआधी माझी कन्या भाग्यश्री ही योजना मुलींसाठी होती. या योजनेअंतर्गत ज्या मुली 01 एप्रिल 2023 नंतर जन्मल्या आहेत अशा मुलींना लेक लाडकी योजनेचा फायदा मिळेल आणि ज्या मुली 01 एप्रिल 2023 च्या अगोदर जन्मल्या होत्या अशा मुलींना माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल.
लेक लाडकी योजना 2024
मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री ही योजना बंद करून राज्यांमध्ये 01 एप्रिल 2023 रोजी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना फक्त आणि फक्त मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह कमी करणे, शिक्षणात मुलींना चालना देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींचे कुपोषण कमी करणे हे काही मुख्य महत्त्वाचे उद्दिष्टे लेक लाडकी योजनेअंतर्गत ठरवले गेले आहे.
लेक लाडकी योजना अनुदान कसे मिळते?
मित्रांनो लेक लाडकी योजनेअंतर्गत त्याच मुलींना अनुदान मिळू शकते ज्यांच्या पालकांकडे किंवा कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड आहेत. लेक लाडकी योजना त्याच मुलींसाठी पात्र आहे ज्या मुली 01 एप्रिल 2023 नंतर जन्मले आहेत. आता लेक लाडकी योजनेअंतर्गत अनुदान कसे मिळते याबद्दल थोडं बोलू. मित्रांनो जेव्हा मुलगी जन्मते तेव्हा त्या मुलीला 5000 हजार रुपये मिळतात. त्यानंतर जेव्हा ती इयत्ता पहिली मध्ये जाते तेव्हा तिला 6000 हजार रुपये मिळतात. जेव्हा मुलगी सहावी जाते तवा तिला 7000 हजार रुपये मिळतात. जेव्हा मुलगी अकरावी जाते तेव्हा त्या मुलीला 8000 हजार रुपये मिळतात आणि जेव्हा मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण होते तेव्हा त्या मुलीला 75 हजार रुपये मिळतात. याप्रमाणे एकूण रक्कम 1,01,000 रुपये मुलीला देण्यात येते.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
लेक लाडकी योजनेअंतर्गत सर्वप्रथम आपल्याला लाभार्थीचा जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीच्या आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँक पासबुक ची झेरॉक्स, रेशन कार्ड पिवळा किंवा केशरी, मतदान कार्ड, लाभार्थीचा शाळेतील दाखला, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते तेव्हा तिला अंतिम लाभ मिळणार असतो. तेव्हा मुलीचे लग्न झालेलं नसलं पाहिजे तरच तिला या योजनेच्या फायदा मिळतो. त्यासाठी लाभार्थीचे अविवाहित असल्याचे स्वयंघोष पत्र लागत.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत जाऊन मुलीच्या जन्माची नोंदणी करावी. त्यानंतर मुलीच्या जन्माचे प्रत व मुलीचे सर्व काही महत्त्वाचे डॉक्युमेंट घेऊन अंगणवाडी सेविकाकडे जमा करावेत अथवा अर्ज सादर करावा. त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका समोरील सर्व काही ऑनलाईन पद्धतीचे प्रोसेस करून घेईल आणि तुमची मुलगी लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र होईल.
1 thought on “लेक लाडकी योजना 2024, जन्मलेल्या मुलीस मिळणार 1 लाख रुपये, पहा अर्ज, कागदपत्र, पात्रता काय आहे? Lek Ladki Yojana”