Cotton Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाच्या भावाला थोडी महागाई आलेली आहे आणि व्यापारी लोकांमध्ये जास्तीत जास्त दराने कापूस विकत घेण्याची शर्यत लागलेली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या दरापेक्षा व्यापारी लोक जास्त दर कापसावरती लावत आहेत. त्यामुळे असा अंदाज निघून येत आहे की पुढच्या महिन्यामध्ये कापसाचे दर हे 8000 पेक्षा जास्त होऊ शकतात. सध्या महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त कापसाला दर 7600 रुपये क्विंटल भेटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मोकळा श्वास घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो सध्या मानवत, सेलू, परभणी, अकोल्यातील काही तालुके आणि देऊळगाव राजा येथे सगळ्यात जास्त कापसाला दर भेटत आहे. त्यामुळे कापसाचा भाव वाढतो की काय असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे.
आजचे कापूस भाव लाईव्ह–Today’s cotton price live
शेतकरी मित्रांनो काल रविवार असल्याने बऱ्याच काही बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातील बऱ्याच बाजार समितीचा रविवारचा डेटा भेटलेला नाही. तरीसुद्धा आम्ही जुगाड करून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार कापसाला किती प्रतिक्विंटल दर लागल हे शोधून काढलेला आहे. शेतकरी मित्रांनो काल देऊळगाव राजा येथे महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव भेटलेला आहे. देऊळगाव राजा येथे कापसाला प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर हा 7600 रुपये एवढा मिळालेला आहे, त्यानंतर परभणी तालुक्यातील मानवत येथे 7550 प्रतिक्विंटन जास्तीत जास्त दर भेटलेला आहे. संपूर्ण यादी पाहण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जिल्ह्यानुसार यादी पहा.
आजचे कापुस भाव जिल्ह्यानुसार यादी
कापसाचे भाव वाढतील का?
होय शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव हे 100% वाढतील! कारण सध्या फेब्रुवारी महिन्याचे शेवटचे दिवस चालू आहेत आणि सध्या केंद्र शासनाने ठरवलेल्या बाजारभावापेक्षा व्यापारी लोक जास्त भावाने कापूस विकत घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना असा अंदाज लावा की सध्या कापसाची टंचाई भासत आहे. सध्या कापसाला जास्तीत जास्त दर हा 7600 प्रतिक्विंटल एवढ्या भेटत आहे. यानुसार थोडा अंदाज लावा की पुढच्या मार्च महिन्यामध्ये कापसाला जास्तीत जास्त 8000 हजार रुपये दर होऊ शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण नाहीये अशा शेतकऱ्यांनी कापूस विकायला काढू नये. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सध्या काहीच पैसे नाहीयेत अशा शेतकऱ्यांनी बिनधास्त आपला कापूस विकायला काढावा.
पंजाब डख हवामान अंदाज, मराठवाडा-विदर्भ धो धो पाऊस पडणार, Punjab Dakh Weather Forecast