Namo Shetkari Yojana 3nd Installment नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक महत्त्वाचं अपडेट आलेला आहे. त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की 28 फेब्रुवारी 2024 रोजी PM किसान सन्माननीय योजनेची 2000 हजार रुपये सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा याच दिवशी शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यासोबतच 23 फेब्रुवारी 2024 रोजी एक नवीन GR राज्य शासनाद्वारे जाहीर केला त्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी शासनाने 2000 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे. तर चला याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया.
नमो शेतकरी योजना 3रा हप्ता
तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य शासनाने नवीन जीआर घोषित केला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांकरिता जवळपास 2000 हजार कोटी इतका निधी वाटप करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याद्वारे 23 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
शेतकरी मित्रांनो 2023-2024 या वर्षी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधीही योजना घोषित करण्यात आलेली होती. ही योजना PM किसान योजनेप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा 28 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेला होता. यासाठी जवळपास 1720 कोटी एवढा निधी वितरित केला होता. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2024 रोजी नमो शेतकरी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 23 फेब्रुवारी 2024 रोजी नमो शेतकरी योजनेअंतर्गत तिसरी हप्त्यासाठी जवळपास 2000 हजार कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी फेब्रुवारी महिन्याच्या आखरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होऊन जाईल.
पी-एम किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार? PM Kisan Yojana 16th Installment Date
नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार?
नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होणार आहे. यासाठी जवळपास 90 लाख शेतकरी पात्र आहे. आणि त्यांच्यासाठी जवळपास 1792 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्तासाठी राज्य शासनाने जवळपास 2000 हजार कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी या दिवशी जमा होईल.
3 thoughts on “नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार? नमो शेतकरी योजना 3रा हप्ता, 2000 कोटी मंजूर GR पहा, Namo Shetkari Yojana 3nd Installment”