Kapus Bajar Bhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो आपण दररोज कापसाचे दराबद्दल माहिती देत असतो. त्यामुळे आपल्या वेबसाईटला रोज भेट देत जा. ज्यामुळे तुम्हाला कापसाचा, तुरीचा, सोयाबीनचा भाव रोज कळेल. मित्रांनो सध्या कापूस दरामध्ये खूपच जास्त तेजी आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पातळीमध्ये कापसाचे भाव जवळ जवळ 5 टक्क्यांनी वाढले आहे.
त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा कापसाचे दर 5 टक्क्यांनी वाढलेली आहे. त्यामुळे कापसाला खूपच जास्त मागणी येत आहे. काल महाराष्ट्र मध्ये कापसाला 8025 रुपये प्रतिक्विंटल कापसाचा दर लागला होता आणि त्याचबरोबर 8 मार्च रोजी कापसाला चक्क 8250 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लागला होता. त्यामुळे कापसाचे दर पुन्हा वाढतील का असे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. शेतकरी मित्रांनो सध्या कापसाची आवक ही बाजारामध्ये कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे कापसाचे दरही आता वाढत चाललेले आहेत. तर चला अजून कोणत्या बाबी आहेत ज्यामुळे कापसाचे भाव वाढू शकतात. त्याबद्दल चर्चा करूया.
आजचे कापसाचे बाजार भाव
आजचे कापसाचे भाव जाणून घेणे आधी शेतकऱ्यांनी हे माहीत करून घ्यावा की आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाची काय मागणी आहे. शेतकरी मित्रांनो आपल्या देशातील कापूस हा संपूर्ण जगामध्ये स्वस्त विकला जातो. त्यामुळे भारतीय कापसाला खूपच जास्त मागणी आहे. त्यातली त्यात महाराष्ट्र मधील कापूस हा संपूर्ण भारत देशातून जास्त आयात केला जातो. भारतीय उद्योगांमध्ये सुद्धा कापसाची सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत कापसाचे स्टॉक हे संपून जातील आणि तेव्हा मात्र कापसाच्या भावात एक जबरदस्त तेजी पाहायला येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या वाट पहावी परंतु जर शेतकऱ्यांकडे पैसे नसतील तर शेतकऱ्यांनी बिंदास कापूस विकून टाकावा. तर चला आज कापसाला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये किती दर मिळाला याबद्दल थोडे चर्चा करूया.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.09/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, Kapus Bajar Bhav Today
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
भद्रावती | 7500 रु. |
मारेगाव | 7600 रु. |
पारशिवनी | 7125 रु. |
अकोला | 7800 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 8000 रु. |
उमरेड | 7510 रु. |
देऊळगाव राजा | 8025 रु. |
मांढळ | 7100 रु. |
यावल | 7180 रु. |
फुलंब्री | 7000 रु. |
मानवत | 8000 रु. |
अमरावती | 7500 रु. |
Kapus Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की जवळपास 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस हा विकून टाकलेला आहे आणि आता फक्त 18% ते 20% कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. उर्वरित कापूस हा व्यापाऱ्यांकडे साठवलेला आहे. त्यामुळे सध्या बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी पाहायला मिळत आहे आणि कापसाचे दर हे हळूहळू वाढत चाललेले आहेत. शासनाने कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव दिला आहे. तरीसुद्धा व्यापारी लोक हमीभावापेक्षा चक्क 1200 रुपये शेतकऱ्यांना जास्त देत आहेत. त्यामुळे इथे थोडा प्रश्न पडतो की व्यापारी लोक इतक्या जास्त पैशांमध्ये कापूस विकत का घेत आहे? याचं कारण म्हणजे कापूस तज्ञांनी लावलेला निकष येत्या दोन महिन्यांमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांकडे कापूस हा संपणार आहे. मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये कापसाला 9000 रुपये प्रतिक्विंटल दर हा सहजासहजी लागणार आहे. हेच महत्त्वाचे सूत्र शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला सरासरी दर हा 7500 ते 7800 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आनंदात आहे. परंतु शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी कापसाचे भाव हे 100% वाढणारच आहेत.
कुसुम सोलर पंप योजना 2024, सौर पंपचे नवीन दर जाहीर पहा लवकर, Kusum Solar Pump Yojana 2024
2 thoughts on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.10/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढणार?, Kapus Bajar Bhav Today”