PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? पीएम किसान सन्मान निधीबाबत मोठी अपडेट, 17th installment of PM Kisan Yojana

17th installment of PM Kisan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी बाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 16 हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून राज्य आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचे मेसेज पडले आणि त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाली.

PM Kisan Yojana

परंतु असे सुद्धा काही शेतकरी आहेत ज्यांना अजून सुद्धा पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता मिळाला नाही याबाबत बरेचसे शेतकरी तक्रार करीत आहेत. शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाचा 16वा हप्ता शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी अटी आणि शर्तीचे पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितले. तरीसुद्धा शेतकरी ऐकण्याच्या धुंदीमध्ये नव्हते, ज्या शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने वेळोवेळी सांगूनही ती ई-केवायसी कडे दुर्लक्ष दिले अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नाही मिळाला आणि जे शेतकरी अजूनही या अटी आणि शर्तींचे पालन करणार नाही त्यांना 17वा हप्ता सुद्धा मिळणार नाही.

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा जुलै महिन्यातील पहिल्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु याबाबत अजून केंद्र शासनाने अधिकृत जाहीर केले नाही. तरीसुद्धा आमच्या अंदाजानुसार पुढील चार महिन्याच्या नंतर जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये पीएम किसानचा 17वा हप्ता जमा होईल. हा हप्ता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्वतःच्या प्रोफाईल अपडेट केल्या असतील. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग, फोन नंबर लिंकिंग, बँक खाते लिंकिंग इत्यादी गोष्टी चे पालन केले नसेल त्यांना 17वा हप्ता मिळणार नाही.

पीएम किसान सन्मान निधीसाठी लोकप्रतिनिधी पात्र?

केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 17वे हप्त्यासाठी आता लोकप्रतिनिधी सुद्धा पात्र आहेत. यामध्ये नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे शेती आहे अशा लोकप्रतिनिधींना दरवर्षी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 6000 हजार रुपये देण्यात येणार आहे. कारण लोकप्रतिनिधी सुद्धा शेतकरी असल्याने त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे असे केंद्र शासनाचे मत आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधी या लाभापासून वंचित असल्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा मिळत नव्हता.

शेतकऱ्यांना मिळतय 3 लाखापर्यंत कर्ज 5% व्याज दराने, प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज मिळणार, Farmer Loan

कुसुम सोलर पंप योजना 2024, सौर पंपचे नवीन दर जाहीर पहा लवकर, Kusum Solar Pump Yojana 2024

4 thoughts on “PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? पीएम किसान सन्मान निधीबाबत मोठी अपडेट, 17th installment of PM Kisan Yojana”

Leave a comment

Exit mobile version