दुष्काळ यादी 2023, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, यादी पहा, Dushkal Yadi 2023

Dushkal Yadi 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो अखेर राज्य शासनाने 16 जिल्ह्यातील 43 तालुक्यात दुष्काळ मंजूर केलेला आहे. या दुष्काळासाठी एक ठराविक निधी सुद्धा मंजूर केलेला आहे. याचा कालच जीआर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केलेला आहे. मित्रांनो 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पिकांनुसार हेक्टरी आर्थिक मदत ही 24,000 रुपये ते 80,000 हजार रुपये दिल्या जाणार आहे. मदत देण्या अगोदर शेतकऱ्याचे किती नुकसान झाले होते ते पाहिले जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्याला ही आर्थिक मदत दिली जाईल.

दुष्काळ निधीच्या अपडेटसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

त्याचप्रमाणे 43 तालुक्यांची दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता या तालुक्यात दुष्काळ ट्रिगर 2 लागू करण्यात आला असल्याने आता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची काही गरज नाही. या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांचे बँक खात्यावर 11 मार्च 2024 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत जमा होणार आहे. तर चला पाहूया 2023 च्या दुष्काळामध्ये कोणते कोणते तालुके पात्र आहेत आणि या तालुक्यांना आणि तालुक्यामधील महसूल मंडळांना किती निधी जाहीर झाला आहे. चला जाणून घेऊ या सर्व काही.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.11/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, Kapus Bajar Bhav Today

दुष्काळ यादी 2023

दुष्काळ यादी 2023

खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागले. खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या उशिरा झाल्या. त्याबरोबरच ऑगस्टमध्ये पडलेल्या 21 दिवसापेक्षा जास्त पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पिकाचे उत्पादन जागेवर जिरले आणि पिकाला पाणी कमी पडल्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्नही खूप कमी झाल आहे. तर काही शेतकऱ्यांचे यंदा काहीच उत्पन्न निघालेले नाही. यामध्ये त्यांचे बी-बियाणे, खते आणि मेहनत या गोष्टींचे पैसे वाया गेले. शेतकऱ्यांना उत्पन्नामधून एकही रुपया नाही भेटला यामुळे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. या 43 तालुक्यांमध्ये जवळपास शेतकऱ्यांची संख्या ही 37 लाख 52 हजार 903 एवढी असून यांच्यासाठी जवळपास 2100 कोटी 87 लाख एवढा निधी मंजूर केला आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण या सर्व तालुक्यांची यादी पाहणार आहोत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात किती शेतकरी आहेत आणि त्या तालुक्यांना किती निधी दिला आहे, याबाबत सुद्धा आपण खाली सविस्तरपणे माहिती दिली आहे.

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? पीएम किसान सन्मान निधीबाबत मोठी अपडेट, 17th installment of PM Kisan Yojana

दुष्काळग्रस्त जिल्हेशेतकरी लाभार्थी संख्यामंजूर निधी
नाशिक 3,50,000 155.74 कोटी
जळगाव 16,921 4 कोटी 88 लाख
अहमदनगर 2,31,831 160 कोटी 28 लाख
सोलापूर 1,82,534 171 कोटी 41 लाख
सातारा 40,406 6 कोटी 74 लाख
सांगली 98,372 22 कोटी 4 लाख
बीड 36,358 241 कोटी 21 लाख
बुलढाणा 4,98,720 18 कोटी 39 लाख
धाराशिव 4,98,720 218 कोटी 85 लाख
अकोला 1,77,253 97 कोटी 29 लाख
कोल्हापूर 228 13 लाख
जालना 3,70,625 160 कोटी 48 लाख
परभणी 4,41,970 206 कोटी 11 लाख
नागपूर 63,422 52 कोटी 21 लाख
लातूर 2,19,535 244 कोटी 87 लाख
अमरावती 10,265 8 लाख

Dushkal Yadi 2023 Maharashtra

मित्रांनो राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या दुष्काळ अनुदान योजना 2023 अंतर्गत आता महाराष्ट्रातील 43 तालुके मधील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, भुईमूग, कांदा या पिकासाठी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत सरसकट मदत देण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये 11 मार्चपासून ते 31 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये जमा होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना

Dushkal Yadi 2023 Maharashtra

जिरायत जमिनीसाठी प्रती हेक्टर 8500 रुपये देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बागायत जमीन साठी प्रति हेक्टर 17 हजार रुपये देण्यात येतील आणि त्याचबरोबर बहुवार्षिक पिकासाठी स्पर्धे हेक्टर 22 हजार 500 रुपये देण्याचे मंजूर केलेले आहे. या दुष्काळासाठी 5 विभाग पात्र आहे ज्यामध्ये नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर.

दुष्काळ यादी 2023, 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे, यादी पहा, Dushkal Yadi 2023

Exit mobile version