बांबू लागवड अनुदान योजना, प्रति हेक्टरी 8 लाखाचे अनुदान, नवीन GR पहा, Bamboo Plantation Subsidy Scheme

Bamboo Plantation Subsidy Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो बांबू लागवड अनुदान योजनेअंतर्गत शासनाने अजून एक नवीन जीआर घोषित केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अजून नव्याने अनुदान मिळणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना खते, निंदणी, संरक्षण, रोजगारी यासाठी अनुदान मिळत नव्हते परंतु आता शेतकऱ्यांना नव्याने या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अनुदानाचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. तुम्हाला माहीत असेल की बांबू लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 7 लाख रुपयांचे अनुदान मिळत असते. आता त्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी जवळपास 8 लाख आसपास अनुदान मिळेल.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की बांबू हे खूप महत्त्वाचे पिक आहे ज्याला आपण हिरवे सोने सुद्धा म्हणतो. बांबूचं गरिबांच्या जीवनात आणि ग्रामीण उद्योगात खूप मोठे स्थान आहे. 28 जून 2019 रोजी निर्गमित झालेल्या मंत्रिमंडळाच्या शासन निर्णयांमध्ये ‘अटल बांबू समृद्धी योजना’ अभियान स्थापित करण्यात आले होते. तेव्हा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 600 टिशू कल्चर रोपे मिळणार होते. आता जास्तीत जास्त 2 हेक्टर करिता शेतकऱ्यांना 1200 टिशू कल्चर रोपे मिळणार असल्याची जीआर मध्ये सांगितले आहे व तसेच राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत बांबू लागवड करिता एकूण 120 रुपयांचे अनुदान 3 वर्षात विभागून मिळत होते आता त्यामध्ये मोठे बदल झाले आहेत ते आपण पुढे पाहूया.

बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाखाचे अनुदान, राज्यात 10 लाख हेक्टर वर बांबू लागवड होणार , Bamboo Plantation Subsidy

बांबू लागवड अनुदान योजना

बांबू लागवड अनुदान योजना

मित्रांनो बांबू लागवड योजने करिता आता नव्याने जीआर सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रतिरोप 120 रुपयांचे अनुदान 3 वर्षात विभागून मिळत होते. परंतु आता त्यामध्ये वाढ झालेली आहे. कारण की शेतकऱ्यांना रोप लागवड, निंदणी, संरक्षण, खते इत्यादी खर्च स्वतःच शेतकऱ्यालाच करायचा होता परंतु आता शेतकऱ्यांना त्यामध्ये अनुदान मिळत आहे. मागील पाच वर्षांमध्ये रोजगार मजुरीचे दर वाढलेले आहेत हे विचारात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना 175 रुपये प्रतिरोप इतके अनुदान 3 वर्षात विभागून देण्याची तरतूद केली आहे. ज्यामध्ये पहिल्या वर्षी 90 रुपये दुसऱ्या वर्षी 50 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 35 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान यासाठी जाहीर केल आहे कारण बांबू लागवडीला भरपूर प्रतिसाद मिळावा आणि यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न भरघोस व्हावे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024

टिशू कल्चर बांबू रोपांच्या प्रजाती

टिशू कल्चर बांबू रोपांच्या प्रजाती

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये मानवेल, कटांग आणि मानगा या प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळून येतात बांबू क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करणाऱ्या तज्ञांसोबत चर्चा करून या 3 प्रजाती सोबत अजून नव्याने 5 प्रजातीची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये.
1) Bambusa balcooa
2) Dendrocalamus brandisii
3) Bambusa nutan
4) Dendrocalamus asper
5) Bambusa tulda

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी, या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शासन निधी मंजूर, Loan waiver Maharashtra

बांबू लागवड अनुदान योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे

बांबू लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान मिळते
या उत्पन्नासोबतच निसर्गाला सुद्धा बऱ्याच काही गोष्टी मिळतात जसे की प्युअर ऑक्सिजन वगैरे आणि यासोबत उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी शेत जमिनीवर बांबू लागवड उपयोगाचे ठरते.
बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण होते आणि आर्थिक स्थिती सुधारणा उंचावण्यास मदत होते

बांबू लागवड अनुदान योजनेचा नवीन GR पहा

1 thought on “बांबू लागवड अनुदान योजना, प्रति हेक्टरी 8 लाखाचे अनुदान, नवीन GR पहा, Bamboo Plantation Subsidy Scheme”

Leave a comment

Exit mobile version