मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana

Mini Tractor Anudan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन योजनेमध्ये. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आजकाल ट्रॅक्टरने शेतामधली किती लवकरात लवकर फटाफट काम होतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना बैलाने शेती करणे परवडत नाहीये. आज प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यासाठी उत्सुक आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे एवढे महागडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे सरकारने ट्रॅक्टर वरती अनुदान योजना राबवली आहे. जर शेतकऱ्यांनो तुम्हाला मोठा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्हाला खूप कमी अनुदान सरकारद्वारे मिळतात. पण शेतकऱ्यांना तुम्हाला जर छोटे ट्रॅक्टर घ्यायचा असेल जसे की 9HP ते 18HP पर्यंत, तर तुम्हाला या ट्रॅक्टर वरती 90% सबसिडी सरकार देत आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन किती लाख रुपयाचे अनुदान देत आहे. हे सर्व काही आपण या लेखांमध्ये बोलणार आहोत.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना राज्यातील सर्व काही अनुसूचित व मागासवर्गीय जाती जमातींसाठी समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. हा मिनी ट्रॅक्टर त्याच लाभार्थ्यांना दिला जाईल जे नवबौद्ध व अनुसूचित जाती अथवा मागासवर्गीय जातीमध्ये मोडल्या जातात. या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर 90% सबसिडीवर दिला जाईल. त्याचप्रमाणे शेतकरी महिला बचत गटांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे. मिनी ट्रॅक्टर वरती सरकार द्वारे 90% सबसिडी देण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थ्यांनी फक्त 10 टक्के रक्कम स्वतःच्या खिशामधून गुंतवायची आहे. पात्र उमेदवारांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचे उपसाधन खरेदी करता 3 लाख 15 हजार रुपयांच अनुदान देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 18HP पर्यंत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर दिल्या जाते.

शेतकऱ्यांनी या योजना वाचाव्या

PM कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंटचे ऑप्शन कधी येणार? Kusum Solar Pump Yojana Payment Option

बोरवेल अनुदान योजना, शेतकऱ्यांना फुकट मिळणार बोरवेल त्यासोबत पंप सुद्धा, अर्ज कसा करायचा पहा?, Borewell Anudan Yojana

मिनी ट्रॅक्टर अनुदान अर्ज प्रक्रिया

मिनी ट्रॅक्टर अनुदान अर्ज प्रक्रिया

ट्रॅक्टरची कंपनी कोणती घ्यायची हे सर्व हक्क लाभार्थ्यांनाच असतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी सर्वप्रथम ट्रॅक्टरच्या डीलरशिप मध्ये जाऊन 18HP पर्यंत ट्रॅक्टर निवडावा. त्यानंतर डाऊन पेमेंट केलेले जे काही कागदपत्र आहेत ते घेऊन पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषद कार्यालयात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागात घेऊन जाणे. तेथे गेल्यावर त्यांच्याद्वारे एक अर्जाचा नमुना देण्यात येतो. तो अर्ज भरल्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि मग हा अर्ज समाजकल्याण विभागाकडे जमा करायचा आहे. त्यानंतर काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती अनुदान मिळून जाईल.

5 thoughts on “मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana”

Leave a comment

Exit mobile version