कर्ज माफी योजना, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रु. अनुदान मिळणार, GR जाहीर, Shetkari Karj Mafi Yojana

Shetkari Karj Mafi Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या काही मागील वर्षांमध्ये जे काही कर्ज काढलं होतं ते कर्ज शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेअंतर्गत व्याज आणि मुद्दल सह परतफेड केलं. अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येत आहे. तर काय आहे ही योजना आणि हा GR कधी जाहीर झाला. याबद्दल आपण सर्व काही माहिती घेणार आहोत आणि त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणते शेतकरी पात्र आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत, तर चला मग सुरुवात करूया.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकरी मित्रांनो 5 मार्च 2024 रोजी सहकार, पणन व वस्त्रउद्योग विभागाद्वारे हा GR जाहीर करण्यात आला असून यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना देण्याची जाहीर केल आहे. 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन पर लाभ देण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकरी मित्रांनो हे प्रोत्साहन अनुदान फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळत आहे. ज्यांनी ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषावरून त्याची विहित मुदतीत परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्सांवर अनुदान देण्यात येत आहे. याची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केली होती.

कर्ज माफी योजना 50,000 रु. अनुदान?

कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रु. अनुदान मिळणार?

शेतकरी मित्रांनो 2017-18 वर्षात घेतलेल्या अल्पमुद्दत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, सन 2019-20 वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, अथवा सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडचा ध्येय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांक पूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पर रक्कम मिळणार आहेत.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana

PM कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंटचे ऑप्शन कधी येणार? Kusum Solar Pump Yojana Payment Option

1 thought on “कर्ज माफी योजना, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रु. अनुदान मिळणार, GR जाहीर, Shetkari Karj Mafi Yojana”

Leave a comment

Exit mobile version