PM कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंटचे ऑप्शन कधी येणार? Kusum Solar Pump Yojana Payment Option

Kusum Solar Pump Yojana Payment Option नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आणि कंपनी निवडण्याचे ऑप्शन कधी येईल असे प्रश्न होते त्या प्रश्नांचे उत्तरे आज आम्ही हे लेखामध्ये घेऊन आलेलो आहोत पीएम कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत पेमेंटच्या ऑप्शन कधी येणार आणि हा सोलार पंप तुमच्या शेतामध्ये कधी येऊन पडणार याबाबत आपण सर्व काही चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक ना एक लाईन वाचणे गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं याकरिता केंद्र शासनाने पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेची सुरुवात केली होती. या योजनेमधून राज्यातील आणि भारतातील सर्व शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर पंप दिले जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांचे दिवसा सिंचन शक्य होते आणि त्यांना गावातील किंवा शेतामधील विजेच्या आधारावर राहण्याची गरज पडत नाही.

PM कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत पेमेंटच्या ऑप्शन कधी येणार?

PM कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत पेमेंटच्या ऑप्शन कधी येणार?

ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत मागच्या वर्षी अर्ज केले होते किंवा ऑनलाईन फॉर्म भरले होते अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज मी तुम्हाला देणार आहे. शेतकऱ्यांनो पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये पेमेंटचे ऑप्शन उपलब्ध होणार आहे. हे पेमेंट ऑप्शन तुम्हाला लॉगिन बेनिफिशरी केल्यानंतर दिसायला मिळेल. जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम पेमेंटच्या ऑप्शन उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला विहिरीचा किंवा तुमच्या बोरवेलचा सर्वे करावा लागेल आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी अपलोड करून 15 ते वी20स दिवसांमध्ये तुमच्या शेतामध्ये हा सोलार पंप बसवण्यामध्ये येईल. साधारणतः सप्टेंबर महिन्यापर्यंत हे सोलर पंप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसवण्यात येईल.

PM कुसुम सोलार पंप योजना अनुदान

PM कुसुम सोलार पंप योजना अनुदान

शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी चे पंप वितरित केल्या जातात आणि या सोलार पंपावरती 90 टक्के पर्यंत अनुदान दिलं जातं आणि मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांना 95 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते

3HP कृषी सोलर पंपाची किंमत 1,93,803 रुपये आहे यावरती केंद्र शासन आणि राज्य शासन 90% ते 95 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते ज्यामध्ये खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना फक्त ज्या योजनेअंतर्गत 19,380 रुपये भरावे लागतात आणि मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांना फक्त 9690 रुपये भरावे लागतात

अशाच प्रकारे 5HP कृषी सोलर पंपाची किंमत 2,69,746 रुपये आहे यावरती केंद्र शासन आणि राज्य शासन 90% ते 95 टक्के पर्यंत अनुदान देते यामध्ये खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना फक्त 26,975 रुपये भरावे लागतात आणि मागासवर्गीय लाभार्थ्यांना फक्त 13,488 रुपये भरावे लागतात.

7.5HP कृषी सोलर पंपाची किंमत 3,74,402 रुपये आहे. यावरती केंद्र शासन, राज्य शासन 90% आणि 95 टक्के अनुदान देतं असतं. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना हा पंप फक्त 37,440 रुपयांना मिळतो आणि मागासवर्गीय लाभार्थ्यांना हा सोलार पंप फक्त १८,७२० रुपयाला मिळतो.

शेतकऱ्यांनी या योजना वाचाव्या

40 तालुक्यात दुष्काळ अनुदान मंजूर, हेक्टरी किती रुपये मिळणार? दुष्काळ अनुदान 2023, यादी पहा, Dushkal Anudan Crop Insurance

बोरवेल अनुदान योजना, शेतकऱ्यांना फुकट मिळणार बोरवेल त्यासोबत पंप सुद्धा, अर्ज कसा करायचा पहा?, Borewell Anudan Yojana

PM कुसुम सोलर पंप योजनेची पात्रता

PM कुसुम सोलर पंप योजनेची पात्रता

पीएम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत जर लाभार्थ्यांना पात्र व्हायचे असेल तर लाभार्थी हे मूळचे भारतीय नागरिक असले पाहिजेत. त्यानंतर ज्या राज्यांमध्ये ही योजना राबवत आहे त्या राज्यातील शासनाने या योजनेकरिता मंजुरी देण्यात असावी. महाराष्ट्र मध्ये पीएम कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत दरवर्षी लाखो हजारो सोलर पंप वितरित केल्या जातात. याकरिता शेतकऱ्यांकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे पारंपारिक वीज कलेक्शन उपलब्ध नसावे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर, बोर, शेततळे किंवा आजूबाजूला नदी नाले अशा शाश्वत पाण्याचा स्त्रोत असावा. यानंतर पीएम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुटतात तेव्हा शेतकरी कोणत्याही एका सौर पंपाकरिता फॉर्ममध्ये पात्र असावे.

PM कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा त्याला पाण्याचा स्त्रोत जोडलेला असावा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • तुमचा फोटो
  • मोबाईल नंबर
Exit mobile version