Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो दिवसन दिवस कापसाचे दर कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे. परंतु सध्या कापसाला सरासरी दर हा महाराष्ट्र मध्ये 7500 प्रतिक्विंटल ते 7800 प्रतिक्विंटल एवढा मिळत आहे. सध्या महाराष्ट्र मधील काही बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च दर मिळत आहे जसे की आज मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 8125 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे आणि अशा बऱ्याच बाजार समिती आहेत ज्या ठिकाणी कापसाला 8000 पेक्षा जास्त बाजार भाव भेटला आहे. शासनाने कापसाला 7020 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव दिला आहे आणि त्यापेक्षाही जास्त दराने कापूस हा महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये विकला जात आहे. त्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढ होणे. व त्यातली त्यात आपल्या देशामध्ये सुद्धा कापसाचे स्टॉक संपत आलेली आहेत. देशामधील उद्योगांना कापसाचे अत्यंत गरज भासत आहे. त्यामुळे कापसाचे तर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तर चला मग पाहूया आजचे कापसाचे बाजार भाव.
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की राज्यामध्ये काही असे जिल्हे आहेत येथील बाजार समितीमध्ये कापसाला एकदम जबरदस्त भाव मिळत आहे. या जिल्ह्यामधील 3 जिल्हे असे आहेत जेथे कापसाला सर्वोच्च भाव मिळत आहे, यामध्ये परभणी येथील मानवत बाजार समिती जेथे कापसाला 8000 हजार पेक्षा जास्त भाव आहे, त्यानंतर देऊळगाव राजा मित्रांनो येथे देखील कापसाला 8000 हजार पेक्षा जास्त दर मिळत आहे, 8 मार्च या रोजी कापसाला देऊळगाव राजा येथे 8300 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत होता. त्यानंतर अकोला येथील काही बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 8100 एवढा मिळत आहे. तर मग चला आज महाराष्ट्र मध्ये कोणत्या कोणत्या पारशिवनी बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च धर लागला आहे याबद्दल चर्चा करूया.
75% पिक विमा 2023, 14 जिल्ह्यांना अनुदान मंजूर, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, 75% crop insurance 2023
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7550 रु. |
राळेगाव | 7930 रु. |
पारशिवनी | 7400 रु. |
उमरेड | 7680 रु. |
मानवत | 8125 रु. |
हिमायतनगर | 7100 रु. |
सिंधी सेलू | 8070 रु. |
देऊळगाव राजा | 8000 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 7980 रु. |
अकोट | 7900 रु. |
Kapus Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो यंदा कापसाचे उत्पन्न बऱ्याच प्रमाणामध्ये घटले आहे. त्याचे कारण म्हणजे यंदाच्या खरीप हंगामामध्ये सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाला. त्याचबरोबर उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या जूनच्या शेवटी पेरण्या आणि कापूस लागवड झाली. त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या दरम्यान कापसाने लावलेला पाऊस कालखंड तो पण सरासरी 21 दिवसापेक्षा जास्त होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के उत्पन्न जागेवर घटली. पिकांना लहान अवस्थेमध्ये असताना व्यवस्थित पाणी न मिळाल्याने पिकांचे उत्पन्न जागेवरच घटली. पिकांना 50 टक्के पेक्षाही कमी माल लागला आणि दिवाळीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हार्वेस्टिंगला आलेला कापूस शेतामध्ये भिजला गेला. त्यामुळे शेतकऱ्याच्या त्या कापसाला व्यवस्थित दर भाव मिळणा. त्याचबरोबर हार्वेस्टिंग आलेला कापूस पावसामुळे खाली पडला गेला आणि तो शेतकऱ्यांच्या पुन्हा कधी कामाला नाही आला. त्यामुळे मित्रांनो यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली आणि खरीप हंगामातील दुष्काळमुळे सुद्धा शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न घटली. शेतकऱ्यांना सध्या दुष्काळ अनुदान मिळत आहे ते दुष्काळ अनुदान राज्यातील 16 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये वाटप केल्या जात आहे ही यादी पाहण्याकरिता नुकसान भरपाई अनुदान 2023 इथे क्लिक करा.
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.11/03/2024, संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”