Dushkal Yadi 2023 शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी अनुदानाची यादी आलेली आहे. शेतकऱ्यांची सरसकट नुकसान भरपाई आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता राज्यातील सुमारे 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिकट 2 लॉन्च करण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो 2023 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद इत्यादी पिकांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्यात अशी दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान मंजूर केले, पण अद्यापही शेतकऱ्यांना एकही रुपयाची मदत भेटली नव्हती.
परंतु सध्या 4 मार्च 2024 रोजी शासनाने एक नवीन जीआर मंजूर केलेला आहे यामध्ये 24 जिल्ह्यांमधील 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये एक मोठा निधी जाहीर केला आहे जो शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये 11 मार्च 2024 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो हे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये तुम्हाला हेक्टरी अनुदान 24 हजार रुपये पासून ते 80 हजार रुपयापर्यंत मिळणार आहे. हे अनुदान तुमच्या पिकांवर अवलंबून असेल तर चला याबद्दल अजून काही चर्चा करूया.
दुष्काळ यादी 2023
मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट आलेले होते. जून महिन्यामध्ये उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खूपच उशिरा झाल्या. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने चक्क 21 दिवसाचा कालखंड लावल्याने पिकांना पाणी कमी पडलं आणि पिकांचे 50 टक्के उत्पन्न हे जागेवर घटले. ज्या गोष्टींना कारणीभूत ठरवून शासनाने शेतकऱ्यांसाठी दुष्काळ योजनाही लागू केली. ज्यामध्ये 31 ऑक्टोबर 2023 रोजी तब्बल 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आणि आता दुष्काळाचा ट्रिगर दोन लागू करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये थेट जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो खाली जिल्ह्यानुसार शेतकरी किती पात्र आहेत आणि त्या जिल्ह्याला किती निधी मंजूर केला आहे याची सर्व माहिती दिलेली आहे. ती तुम्ही वाचून घ्यावी.
Sr.No | दुष्काळग्रस्त जिल्हे | शेतकरी लाभार्थी संख्या | मंजूर निधी |
1) | नाशिक | 3,50,000 | 155.74 कोटी |
2) | जळगाव | 16,921 | 4 कोटी 88 लाख |
3) | अहमदनगर | 2,31,831 | 160 कोटी 28 लाख |
4) | सोलापूर | 1,82,534 | 171 कोटी 41 लाख |
5) | सातारा | 40,406 | 6 कोटी 74 लाख |
6) | सांगली | 98,372 | 22 कोटी 4 लाख |
7) | बीड | 36,358 | 241 कोटी 21 लाख |
8) | बुलढाणा | 4,98,720 | 18 कोटी 39 लाख |
9) | धाराशिव | 4,98,720 | 218 कोटी 85 लाख |
10) | अकोला | 1,77,253 | 97 कोटी 29 लाख |
11) | कोल्हापूर | 228 | 13 लाख |
12) | जालना | 3,70,625 | 160 कोटी 48 लाख |
13) | परभणी | 4,41,970 | 206 कोटी 11 लाख |
14) | नागपूर | 63,422 | 52 कोटी 21 लाख |
15) | लातूर | 2,19,535 | 244 कोटी 87 लाख |
16) | अमरावती | 10,265 | 8 लाख |
17) | Total | 37 लाख 52 हजार 903 | 2100 कोटी 87 लाख |
दुष्काळी अनुदान 2023
शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम अनुदानाबद्दल चर्चा करूया. तर शेतकरी मित्रांनो या दुष्काळाने तब्बल 43 तालुक्यांना होरपळून काढलेले आहे. शेतकऱ्यांची अशी दैनिक परिस्थिती पाहता राज्य शासनाने 43 तालुक्यासाठी 2100 कोटी 87 लाख रुपयांचा निधी 37 लाख 52 हजार 903 शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो या 16 जिल्ह्यांमधील तब्बल 43 तालुक्यांसाठी हा मोठा निधी जाहीर करण्यात अतिशय कौतुकास्पद आहे. शासनाला खरंच शाबासकी दिली पाहिजे. कारण शासनाने येथे थोडीही हरामखोरी दाखवली नाही. या जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांना सरकारकडून विविध पिकांसाठी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये पर्यंत मदत देण्यात येणार आहे ज्यामध्ये
जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये मिळणार आहेत
बागायत जमीन साठी प्रति हेक्टर 17,000 रुपये मिळणार आहेत
बहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर 22500 रुपये मिळणार आहेत
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.11/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, Kapus Bajar Bhav Today
1 thought on “दुष्काळ यादी 2023, 16 जिल्ह्यातील 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, दुष्काळी अनुदान 2023, यादी पहा, Dushkal Yadi 2023”