75% crop insurance 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची वेळ आलेली आहे. शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने 75 टक्के पिक विम्याची मंजुरी दिलेली आहे. हा पिक विमा तुमच्या बँक खात्यावर 11 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत जमा होणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या जीआर ने दिली आहे. या 75 टक्के पीक विमा साठी राज्य शासनाने एक मोठा निधी मंजूर केलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 24,000 हजार रुपये ते 30,000 रुपये देण्याचे शासनाने मान्य केले आहे. या पिक विमा मध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांचे नुकसान भरपाई मिळणार आहे. ती नुकसान भरपाई 14 जिल्ह्यामध्ये मंजूर असून उर्वरित 75 टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकर जमा होणार असल्याचे शासनाने सांगितले आहे. तर दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 25% पीक विम्याचे वाटप करण्यात आले होते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 18000 रुपये मिळाले होते. तर मग चला जाणून घेऊया आपण 75 टक्के पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे.
75% पिक विमा 2023
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की 2023 चा खरीप हंगाम आपल्यासाठी किती कठीण गेला आहे. या खरीप हंगामामध्ये आपली पेरणी खूप उशिरा झाली. जूनच्या शेवटी पेरणी झाल्यामुळे तसेच खरीप हंगामातील सरासरी कमी पडलेल्या पावसामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पिकांचे उत्पादन जागेवरच वाया गेले. ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाच्या पिक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांची पिक पाहणी अधिकाऱ्यांद्वारे झाली गेली आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची 50% पेक्षा जास्त उत्पन्न घटले आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी पात्र केल.
पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 25% पीक विम्यामध्ये तब्बल शेतकऱ्यांना 1700 कोटी एवढा निधी वितरित केला गेला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये ते 24 हजार रुपये मिळाले होते. तर शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटपाची सुरुवात 11 मार्च पासून सुरू होणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सर्व जिल्हे वाचून घेऊ शकता आणि जिल्ह्यांना किती निधी मंजूर आहे आणि एकूण जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.11/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, Kapus Bajar Bhav Today
पात्र जिल्हे | मंजूर रक्कम | लाभार्थी शेतकरी |
अमरावती | 8 लाख | 10,256 |
लातूर | 244 कोटी 87 लाख | 2,19,535 |
नागपूर | 52 कोटी 21 लाख | 63,422 |
परभणी | 206 कोटी 11 लाख | 4,41,970 |
जालना | 160 कोटी 48 लाख | 3,70,625 |
कोल्हापूर | 13 लाख | 228 |
अकोला | 97 कोटी 29 लाख | 1,77,253 |
धाराशिव | 218 कोटी 85 लाख | 4,98,720 |
बुलढाणा | 18 कोटी 39 लाख | 36,358 |
बीड | 241 कोटी 41 लाख | 7,70,574 |
सांगली | 22 कोटी 4 लाख | 98,372 |
सातारा | 6 कोटी 74 लाख | 40,406 |
सोलापूर | 111 कोटी 41 लाख | 1,82,534 |
अहमदनगर | 160 कोटी 28 लाख | 2,31,831 |
1 thought on “75% पिक विमा 2023, 14 जिल्ह्यांना अनुदान मंजूर, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, 75% crop insurance 2023”