Dushkal Yadi 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजून एका नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ भरपाई मंजूर झालेली आहे. ही दुष्काळभरपाई 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. याकरिता 2 हेक्टर नुकसान भरपाई एवजी राज्य शासनाने 3 हेक्टर नुकसान भरपाईस मान्यता दिली आहे. म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत अनुदान मिळणार आहे. तर हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत? याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यानुसार यादी सुद्धा आपण पाहणार आहोत चला मग सुरु करूया.
दुष्काळ भरपाई 2023
खरीप हंगाम 2023 शेतकऱ्यांसाठी फारच त्रास ठरलेला आहे. कारण की संपूर्ण राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये खूप कमी पाऊस झालेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. खरीप हंगाम 2023 ऑगस्ट मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने म्हणजे 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा कालखंड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन आणि कापसाला पाणी कमी पडल्याने 50% पेक्षा जास्त उत्पन्न घडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा घाटा सहन करावा लागला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यांमध्ये अशी स्थिती पाहता शासनाने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आणि शासनाने या सर्व 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ भरपाई सुद्धा देण्याचे आवाहन दिले. सध्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 2 हेक्टर एवजी 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचे शासनाने मंजुरी दिली आहे यामध्ये 33% पेक्षा जास्त झालेल्या नुकसान चे शासन भरपाई करून देईल.
कडबा कुट्टी मशीन योजना, 100% अनुदान, वाचा सविस्तर माहिती, Free Kadba Kutti Machine Yojana
दुष्काळ अनुदान यादी 2023
शेतकऱ्यांना शासनाने 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे या दुष्काळग्रस्त तालुक्यांकरिता शासनाने शेतकऱ्यांसाठी 2443 कोटी 22 लाख एवढा निधी 29 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त 30 हजार रुपयापर्यंत मदत मिळेल असे आम्ही अपेक्षा करू, ही मदत बागायती, जिरायती पिक आणि वार्षिक पिके यांच्यासाठी वेगवेगळी असेल.
राज्यातील तालुक्यांमध्ये 40 दुष्काळग्रस्त तालुके पुढील प्रमाणे दिलेले आहेत या सर्व तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 31 मार्च पर्यंत दुष्काळाचे पैसे जमा होणार आहेत यामधील मिरज, खानपुर विटा, कडेगाव, शिराळा, गडहिंग्लज, हातकणंगले, खंडाळा, वाई, सांगोला, करमाळा, माढा माळशिरस, बार्शी, इंदापूर, दौंड, शिरूर घोड नदी, बारामती, पुरंदर सासवड, लोहारा, धाराशिव, लातूर, वाशी, आंबेजोगाई, धारूर, वडवणी, मंठा, अंबड, बदनापूर, जालना, भोकरदन, सोयगाव, छत्रपती संभाजी नगर, लोणार, बुलढाणा, चाळीसगाव, नंदुरबार, शिंदखेडा, येवला, सिन्नर, मालेगाव या सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना लवकरच काळाचे पैसे मिळणार आहेत यांच्याकरिता शासनाने एक मोठा निधी जाहीर केलेला आहे.
कुठेय यादी ?
Link Check Kra