सोलापूर जिल्ह्यातील 28 हजार शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला नाही, PM-Kisan Samman Nidhi

PM-Kisan Samman Nidhi नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 28 हजार शेतकरी सोळाव्या हफ्त्यापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील एकूण सव्वा पाच लाख(5.15Lakh) शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत. पण तरीसुद्धा 28 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला नाही. सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये दुष्काळ सुद्धा जाहीर केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अजून देखील दुष्काळाचे पैसे सुद्धा नाही मिळाले आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची हप्ते नाही मिळाली. शेतकऱ्यांसाठी हे 2000 हजार रुपयांचे 2 हप्ते खूप महत्त्वाची आहेत. तरीसुद्धा शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून मिळत नाही याची शेतकरी खंत व्यक्त करत आहे.

पीएम-किसान सन्मान निधी

Solapur News शेतकरी मित्रांनो 28 हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधी पासून वंचित राहिले आहेत. याचे कारण स्वतः शेतकरीच आहेत. कारण की वेळोवेळी शासनाने सांगून सुद्धा शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या बँक खात्याच्या ई-केवायसी करून नाही घेतल्या. वेळोवेळी शेतकऱ्यांनी बँक खाते ही आधार कार्ड ला जोडून नाही घेतले आणि आपला फोन नंबर सुद्धा बँक खात्याशी जोडून नाही घेतला या छोट्या छोट्या गोष्टींना दुर्लक्ष केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 28 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता नाही मिळाला. त्याबरोबरच बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता नाही मिळाला यामुळे शेतकरी सध्या शासनावर नाराज आहेत.

दुष्काळ भरपाई मंजूर, 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे, यादी पहा, Drought compensation approved

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.07/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Kapus Bajar Bhav Today

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तेवढाच आधार म्हणून हे पी एम किसान सन्मान निधी योजना चे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे होते, शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या ते 4000 हजार रुपये मिळत नाहीये. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, बार्शी, माढा आणि करमाळा या 5 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात दुष्काळ जाहीर केला होता आणि आतापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये दुष्काळाचा एक रुपयाही नाही आला.

फळबाग लागवड योजना 2024, फळबाग लागवडीसाठी 3 वर्ष 50% अनुदान, नवीन जीआर पहा, Orchard Plantation Scheme 2024

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोहळ्या हप्त्यापासून आधार कार्ड बँकेची न जोडलेले शेतकरी तब्बल 8000 हजार आहेत तसेच 3000 असे शेतकरी आहेत ज्यांनी केवायसी नाही केली. असे एकूण 28 हजार 800 शेतकरी आहे जे या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले केवायसी करून घ्यावी नाहीतर पुढील हप्ता सुद्धा शेतकऱ्यांचे बँक खात्यावर पडणार नाही

Leave a comment

Exit mobile version