Maharashtra Police Bharti 2024 महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 17471 पेक्षा जास्त जागांची भरती या पोलीस भरतीमध्ये होणार आहे. मित्रांनो 5 मार्च रोजी ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत. यासाठी काय काय शारीरिक पात्रता लागणार आहे? शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? वयाची अट किती असणार आहे? कागदपत्रे कोणती कोणती तयार ठेवायची आहेत? परीक्षेचे स्वरूप कसे असेल आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल हे आपण सर्व जाणून घेणार आहोत. तर चला तयारीला लागा फॉर्म भरायच्या अगोदर सर्व माहिती तुम्ही वाचून घेणे खूपच आवश्यक आहे.
Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत सुरू होणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे फॉर्म वगैरे भरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 01 मार्च 2024 पासून पोलीस भरतीच्या जाहिराती महापोलीस ऑफिशियल वेबसाईटवर सुरू होतील. महाराष्ट्र मध्ये जवळपास 17 हजार पेक्षा जास्त पोलीस पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई(SRPF) पदांसाठी बारावी पास असणे महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस शिपाई चालकासाठी ड्रायव्हिंग लायसन असणे महत्त्वाचे आहे.
विभागाचे नाव | महाराष्ट्र पोलीस विभाग |
एकूण जागांची भरती | 17471 |
अर्ज पद्धत | Online |
वयोमर्यादा | 19 ते 28 वर्ष |
अधिकृत वेबसाईट | WWW.MAHAPOLICE.GOV.IN |
अर्ज करण्यासाठी वेबसाईट | policerecruitment2024.mahait.org |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 महत्त्वाच्या सूचना
- उमेदवार फक्त एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. ही सूचना खूप महत्त्वाची आहे. दहा-पंधरा अर्ज करत बसायचं नाही फक्त एकच अर्ज करायचा आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एका घटकाकरिता अर्ज करू शकतो. हे ध्यानात ठेवायचे आहे उमेदवारांनी.
- जर उमेदवाराची माहिती चुकीची आढळल्यास त्या उमेदवाराला कोणत्याही वेळी रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांना अर्ज करण्याकरिता दिनांक 5 मार्च ते 31 मार्च पर्यंत कालावधी दिला आहे. या वेळेत तो policerecruitment2024.mahait.org या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाइन अर्ज करू शकतो.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असेल ज्यामध्ये उमेदवारांना 50 टक्के गुण घ्यायचे आहेत म्हणजे कमीत कमी 25 मार्क घ्यायची आहे.
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 165सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF:168 सेमी) | 158 सेमी पेक्षा कमी नसावी |
छाती | न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी | – |
पोलीस शिपाई शारीरिक चाचणी
क्रिया | पुरुष | महिला | गुण |
धावणे | 1600 मीटर | 800 मीटर | 20 |
100 मीटर | 100 मीटर | 15 | |
गोळा फेक | — | — | 15 |
टोटल | — | — | 50 |
पोलीस शिपाई चालक शारीरिक चाचणी
क्रिया | पुरुष | महिला | गुण |
धावणे | 1600 मीटर | 800 मीटर | 30 |
गोळा फेक | — | — | 20 |
टोटल | — | — | 50 |
पोलीस शिपाई SRPF शारीरिक चाचणी
क्रिया | पुरुष | महिला | गुण |
धावणे | 0.5 किमी | — | 50 |
100 मिटर | — | 25 | |
गोळा फेक | — | — | 25 |
टोटल | — | — | 100 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल. ज्यामध्ये उमेदवारांना 40% गुण घ्यायचे आहेत. म्हणजे कमीत कमी 100 पैकी 40 मार्क घ्यायचे आहेत. लेखी परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला होईल. त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज भरताना नीट विचार करून अर्ज भरावा.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 आवश्यक कागदपत्रे
- SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी
- खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल
- मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रीमीलियर प्रमाणपत्र
- माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
- गृह रक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
- पोलीस पाल्य प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र
- अंशकालीन प्रमाणपत्र
- इडब्ल्यूएस प्रमाणपत्र
- NCC प्रमाणपत्र
1 thought on “महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17471 पदांची भरती? लागणारी कागदपत्रे, पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज तारीख सर्व डिटेल मध्ये वाचून घ्या, Maharashtra Police Bharti 2024”