Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला सरासरी दर 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर लागत आहे. शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कापसाचे दर थोडे उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या कापूस विकायची गडबड करू नये. कापसाचे भाव चक्क 200 रुपये ते 300 रुपये या दराने उतरली आहेत. ज्या बाजार समितीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये कापसाला 8000 हजार रुपये प्रतिक्विंटल दर भेटत होता, आता त्या कापसामध्ये नरमाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय करावे ते कळत नाहीये. तर कापसाचे भाव कधी वाढतील जेणेकरून शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी पुन्हा गुंजाइश सापडेल याबद्दल सर्व काही डिटेल मध्ये या लेखांमध्ये डिस्कस करूया.
आजचे कापसाचे बाजार भाव दि.05/03/2024
आजच्या कापसाचे बाजार भाव पाहायची झाल्यास, शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हे समजणे गरजेचे आहे की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणत्या बाजार समिती आहेत ज्यांमध्ये सर्वात जास्त कापसाला दर मिळतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र मध्ये 3 बाजार समिती अशा आहेत ज्यामध्ये एकदम जबरदस्त बाजार भाव भेटतो. ज्यामध्ये परभणी मधील मानवत बाजार समिती, दुसरी देऊळगाव राजा बाजार समिती आणि तिसरी अकोला बाजार समिती या तीन बाजार समितीमध्ये कापसाला एकदम चांगला दर मिळतो. तर चला बघूया आज किती दर मिळाला आहे.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7250 रु. |
सावनेर | 7000 रु. |
मौदा | 7150 रु. |
अकोला | 7550 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 7800 रु. |
मानवत | 7850 रु. |
देऊळगाव राजा | 7730 रु. |
नेर परसोंपत | 6800 रु. |
काटोल | 7100 रु. |
हिंगणघाट | 7635 रु. |
वर्धा | 7550 रु. |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचा पुन्हा भाव कमी झाला आहे आणि त्यातली त्यात फेब्रुवारी महिन्याचा पहिला हप्ता चालू आहे. ज्याप्रमाणे कापूस अभ्यासकांनी सांगितले होते की कापसाचे दर हे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यापासून वाढतील आणि मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यापर्यंत कापसाला चांगला भाव मिळेल. कापूस अभ्यासकांची भविष्यवाणी खरी ठरली. आता यानंतर कापूस अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की सध्या महाराष्ट्र मध्ये 75 टक्के शेतकऱ्यांनी सर्व कापूस विकला आहे. आता फक्त 25 टक्के ते 20 टक्के कापूस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात कापसामध्ये थोडीशी दर वाढ होऊ शकते, ते कसे होऊ शकते ते पण तुम्हाला सांगतो.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसाला अचानक भाव वाढला होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कापसाला सरासरी दर हा 6700 रुपये प्रतिक्विंटल ते 7000 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यानंतर या कापूस दरामध्ये 10 टक्के भाव वाढ झाली आणि कापसाचे दर अचानक वर चढले. महाराष्ट्र मध्ये मागच्या पंधरवड्यात कापसाला जास्तीत जास्त दर 8200 रुपये प्रतिक्विंटल एवढा भेटला होता. आता कापूस अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यामध्ये या कापूस दरामध्ये पुन्हा 5 टक्के वाढ होऊ शकते. म्हणजे मे महिन्यापर्यंत कापसाला 8500 पर्यंत जास्तीत जास्त दर होऊ शकतो.
शेतकऱ्यांनो या योजना वाचा