PM Kisan Yojana 17th installment नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजून एका नवीन लेखांमध्ये, शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये कधी जमा होणार आहे? याबद्दल बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची प्रश्न आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता मिळाला नाही याबाबत सुद्धा आपण या लेखांमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. सतराव्या हप्त्याच्या तारखे बद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि या 17व्या हप्त्या बद्दल शासनाने नवीन काय काय नियम लावले आहेत म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा मिळणार याबाबत सुद्धा आपण या लेखांमध्ये चर्चा करणार आहोत.
PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की पीएम किसान योजनेचा 16वा हप्त्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 29 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून वितरित करण्यात आला होता. यावेळी जवळपास 90 लाख शेतकऱ्यांपैकी 88 लाख शेतकऱ्यांना हा पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता प्राप्त झालेला आहे. पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होणार असल्याचे अंदाज आहेत. कारण पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांना 2 हजार रुपये मिळतात. आपल्याला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटी मिळाला. त्यानंतर काही अंदाजानुसार असे समजते की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होऊन जाईल.
PM किसान योजनेचा 16वा हप्ता का नाही मिळाला?
पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नाही जमा झाला. त्याचे कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाही केले. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी वेळोवेळी केवायसी नाही करून घेतली आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी लँड सेडिंग करून नाही घेतली. या काही कारणामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नाही भेटला. तर शेतकऱ्यांना सोळावा आणि पुढील हप्ता पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सीएससी केंद्र मधील जाऊन किंवा आपल्या जवळील महा-ई-सेवा केंद्रावर ती जाऊन स्वतःची केवायसी करून घ्यावी, आधार कार्ड बँक जोडून घ्यावं आणि लँड सेडिंग सुद्धा करून घ्यावी. एवढे सगळे काम केल्यावर तुमच्या बँक खात्यामध्ये जेव्हा योजनेचा सतरावा हप्ता जमा होईल तेव्हा 16 वा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला एकूण 4 हजार रुपये मिळतील.
3 thoughts on “PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? 17व्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट, PM Kisan Yojana 17th installment”