Gold Rate Today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. मित्रांनो सोन्याचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे तुम्ही सोन घेण्यासाठी लवकरात लवकर घाई करावी नाहीतर सोन्याचे भाव लवकर 70 हजार रुपये पर्यंत वाढू शकतात. कारण मागील फक्त 11 दिवसांमध्ये सोन्याचे भाव चक्क 3 हजार रुपये वाढले आहेत. मार्च महिना जेव्हापासून सुरू झाला आहे तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ बघायला मिळत आहे. सोनं महाग होण्याचे कारण काय आहे हे आपण सर्व काही या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे ती म्हणजे 11 मार्च रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत चक्क 680 रुपयांनी वाढली होती म्हणजे हा सोन्याचा भाव प्रतितोळा 62 हजार 635 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजे तुम्ही थोडा अंदाज लावू शकता सोन्याचा भाव दिवसेंदिवस किती वाढत चाललेला आहे.
आजचे सोन्याचे भाव?
मित्रांनो 2023 च्या सुरुवातीला सोन्याची भाव प्रतितोळा 54867 रुपये इतके होते. त्यानंतर या सोन्याच्या भावामध्ये 31 डिसेंबर 2023 रोजी चक्क 16 टक्क्यांनी वाढ झाली होती. म्हणजे हे सोन्याचे भाव 63 हजार 246 रुपयांनी वाढले आणि आता तर हा भाव शक्य 70 हजार रुपयांच्या घरामध्ये जात आहे. मित्रांनो 01 मार्च रोजी सोन्याची किंमत प्रतितोळा 62592 रुपये एवढी होती. त्यानंतर चक्क 11 दिवसांनी यामध्ये 3 हजार रुपयांची वाढ झाली आणि सध्या या सोन्याची किंमत मार्केटमध्ये पतितोळा 65 हजार 635 रुपयांवर पोहोचली आहे. मित्रांनो हा 65 हजार रुपयांचा टप्पा सोन्याने 7 मार्च रोजी पार केला आहे आणि दिवसेंदिवस सोन्याची भाव ही वाढत चाललेली आहे. काही दिवसा अगोदर चांदीचा भाव 70000 रुपये प्रति किलो होता आता चांदीचा भाव 72 हजार 539 रुपये प्रति किलो आहे.
सोन्याचे दर का वाढत आहेत?
सोन्याचे दर का वाढत आहेत हे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये सध्या गुरुमाळत असतील याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगू इच्छितो. तर मित्रांनो एका रिपोर्ट अनुसार सोन्याच्या दरवाढीचे कारण म्हणजे चीनची सेंट्रल बँक कडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केल्या जात आहे आणि त्याची साठवणूक केल्या जात आहे. सध्याची चीनजवळ एकूण साठा 2245 टनांवर पोहोचला आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की चीन किती मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करत आहे. त्यानंतर 2024 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत पसरत आहेत आणि त्यानंतर जगातून केंद्रीय बँकेचा खरेदीचा धडाका हे महत्त्वाचे कारण आहेत दरवाढीचे.