मार्च-एप्रिल महिन्यात कापसाचे भाव वाढतील का? Cotton Rate Today

Cotton Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे व्यापारी लोकांना आणि शासनाला दिसत आहे. त्यामुळे शासन होईल तेवढे बाजार भाव कमी करण्याचे पाहत आहे. सध्या केंद्र शासनाने कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल तेवढा हमीभाव दिला आहे. यापेक्षाही 1000 रुपयांनी जास्त सध्या कापसाला मागणी बऱ्याच बाजार समितीमध्ये मिळत आहे. त्यामुळे कापसाचे भाव वाढतील का? असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या फिरत आहेत. आज आपण सर्व काही जाणून घेणार आहोत की मार्च-एप्रिल महिन्यामध्ये कापसाचे भाव वाढतील का? आणि वाढतील तर कशामुळे वाढतील? आणि किती वाढतील? हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत.

आजचे कापुस बाजार भाव

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाचे दर हे वाढत चाललेले आहे. सध्या देऊळगाव राजा येथे कापसाला 8200 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर भेटलेला आहे. त्याचबरोबर परभणी येथील बाजार समितीमध्ये कापसाला 8020 रुपये प्रति क्विंटल एवढा दर भेटलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या श्वासात श्वास घेतलेला आहे. कापसाचे भाव एप्रिल महिन्यात कसे राहतील हेच सध्या सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न गुरमाळत आहेत. शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त 20 ते 25 टक्के कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.08/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Kapus Bajar Bhav Today

आजचे कापुस बाजार भाव

फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसामध्ये अचानक 10% भाव वाढ झाली होती. जानेवारीमध्ये साधारणतः कापसाला 6500 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत होता. परंतु फेब्रुवारीमध्ये अचानक कापसाचे भाव 8000 रुपये प्रति क्विंटल वर गेले आणि सध्या देऊळगाव येथे 8200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. कापसाचे भाव हे एप्रिल मे महिन्यात वाढणार आहे. असे तज्ञांनी सांगितले आहे.

कापसाचे भाव वाढतील का?

कापसाचे भाव वाढतील का?

शेतकरी मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी वाढली आहे. कारण अमेरिकेच्या देशातील 80 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त 20% शेतकऱ्यांनी कापूस जपून ठेवलेला आहे आणि भारतामध्ये सुद्धा उद्योगांमध्ये कापसाचे खूपच गरज भासत आहे. त्यामुळे कापसाचे भाव हे आता वाढत चालले आहेत. काही कापूस तज्ञांच्यानुसार मार्च-एप्रिल महिन्यामध्ये कापसाचे भाव पुन्हा वाढू शकतात. सध्याच्या कापूस दरामध्ये पुन्हा 5 टक्के दर वाढ होऊ शकते. असे काही कापूस तज्ञांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस जपून ठेवावा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कापसाचे भाव 100% वाढतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024, ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार आणि साधने मिळणार मोफत, Chief Minister Vyoshree Yojana 2024

कुसुम सोलर पंप योजना 2.0, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार? नवीन योजना सुरू, Kusum Solar Pump Yojana 2024

Leave a comment

Exit mobile version