Installment of Namo Farmer Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता. यावेळी 88 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र शासनाचा पीएम किसान योजनेचा 16वा हप्त्याचे 2000 हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये पहिला हप्ता भेटला होता अशा शेतकऱ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता 29 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात आला. म्हणजे नमो शेतकरी योजने अंतर्गत 4000 हजार रुपये आणि पीएम किसान योजनेअंतर्गत 2000 हजार रुपये असे एकूण 6000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. परंतु अद्याप सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता जमा नाही झाला. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत, तर चला मग सुरु करूया.
Note(मीडिया रिपोर्ट अनुसार बऱ्याच शेतकऱ्यांना नमो योजनेचा 2रा आणि 3रा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटी मिळणार)
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार?
तर शेतकरी मित्रांनो 29 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाने तब्बल 1791 कोटी रुपयांचा निधी 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 90 लाख शेतकऱ्या पैकी फक्त 88 लाख शेतकरी पात्र झाली होती. कारण की उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या ई केवायसी करून नाही घेतल्या त्यासोबतच आधार कार्ड बँक खात्याची जोडून नाही घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँड शेडिंग नाही करून घेतलं. या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता नाही मिळाला. सर्वात महत्त्वाच म्हणजे ज्या शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला होता अशाच शेतकऱ्यांना 29 फेब्रुवारी रोजी दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना अंतर्गत दिवाळीमध्ये पहिला हप्ता नव्हता मिळाला अशा शेतकऱ्यांना 29 फेब्रुवारी 2019 रोजी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे यांच्या बँक खात्यामध्ये आता दुसरा आणि तिसरा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होईल.
मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra
पिक विमा 2024, पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार?
तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्या अगोदर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये पात्र होणे खूप गरजेचे आहे. तर तुम्हाला दिवाळीमध्ये पहिला हप्ता मिळाला असेल त्यानंतर 29 फेब्रुवारी 2024 या दुसऱ्या टप्प्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे लाभ तुम्हाला भेटला असेल तरच तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे.
जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत दिवाळीमध्ये पहिल हप्ता मिळाला नव्हता आणि तुम्हाला 29 फेब्रुवारी 2024 रोजी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये दुसरा आणि तिसरा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होणार आहे. तुमच्यासाठी चौथा हप्ता खूप दूर आहे. नमो शेतकरी योजना चौथा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांना पहिल्या दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला आहे.
1 thought on “नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? नमो शेतकरी दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता कधी मिळणार? Installment of Namo Farmer Scheme”