ठाणे पोलीस भरती 2024, पहा किती पदांसाठी भरती होणार? संपूर्ण माहिती, Thane Police Bharti 2024

Thane Police Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2024 करिता जवळपास 17441 पदांची भरती होणार आहे आणि यामध्ये ठाणे पोलीस भरती 2024 करिता जवळजवळ 119 पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने 31 मार्च पर्यंत सादर करायचा आदेश दिला आहे. लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्याकरिता 5 मार्च ते 31 मार्च पर्यंत कालावधी दिला आहे. यासाठी या कालावधीमध्ये लाभार्थ्यांनी आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट जमा करून अपलोड करणे महत्त्वाचे आहे. व त्यासोबतच पात्रता काय आहे, शिक्षण किती पाहिजे? परीक्षा फी, पगार किती मिळेल आणि वयोमर्यादा काय आहे? या सर्व गोष्टी आपण या लेखांमध्ये डिस्कस करणार आहोत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्या आणि त्यानंतरच अर्ज प्रक्रियेच्या भानगडीत पडावे.

ठाणे पोलीस भरती 2024

ठाणे पोलीस भरती 2024

मित्रांनो ठाणे पोलीस भरती करिता जवळपास 119 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 5 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे. पदांची भरती पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या करीत आहे. या दोन्ही पदांकरिता शैक्षणिक पात्रता ही 12वी पास आहे. ठाणे पोलीस भरती 2024 अंतर्गत वयोमर्यादा खुल्या प्रवर्गात 18 वर्षे ते 28 वर्षे पर्यंत आहे आणि मागास प्रवर्गामध्ये वयोमर्यादा 18 ते 33 वर्षापर्यंत नमूद केलेली आहे. अर्ज फीस बद्दल बोलले जाव तर खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फीस आकारला जाईल आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता 350 रुपये आकारल्या जातील. इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास फक्त एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच घटकात उमेदवार अर्ज करू शकतात.

हे सुद्धा वाचा

मुंबई पोलीस भरती 2024, किती पदांची भरती होईल? पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पहा सर्व काही, Mumbai Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17471 पदांची भरती? लागणारी कागदपत्रे, पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज तारीख सर्व डिटेल मध्ये वाचून घ्या, Maharashtra Police Bharti 2024

एकूण पदांची भरती119
पदाचे नावपोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पोलीस शिपाई जागा81
पोलीस शिपाई चालक जागा38
शैक्षणिक पात्रता12वी पास
वयोमर्यादा खुल्या प्रवर्गात 18 ते 28 वर्षे, मागास प्रवर्ग 18 ते 33 वर्षे
अर्ज फीसखुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये, मागासवर्गीय 350 रुपये
लेखी परीक्षा100 Mark (40% गुण आवश्यक)
शारीरिक चाचणी50 Mark (50% गुण आवश्यक)
ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाईटpolicerecruitmnt2024.mahit.org

ठाणे पोलीस भरती 2024 अर्ज कसा करावा

ठाणे पोलीस भरती 2024 अर्ज कसा करावा
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीचा अर्ज करायचा आहे. त्यानुसार शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांची चुकीचे किंवा खोटी माहिती आढळल्यास त्यांचा अर्ज जाग्यावरच रद्द करण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करता वेळेस नियमांचे पालन न केल्यास त्यांचा अर्ज कोणत्याही वेळी रद्द करण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करते वेळेस सर्व कागदपत्र अपलोड करावे.
  • अर्ज करता वेळेस स्कॅन केलेला पासपोर्ट आणि स्वाक्षरी JPG फॉरमॅट मध्ये अपलोड करावी.
  • अर्ज फी भरताना ऑनलाईन पद्धतीने UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड द्वारे की भरावी.

ठाणे पोलीस भरती 2024 करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जन्म दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी
  • खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल
  • मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रीमीलियर प्रमाणपत्र
  • माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
  • गृह रक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
  • पोलीस पाल्य प्रमाणपत्र
  • अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र
  • अंशकालीन प्रमाणपत्र
  • इडब्ल्यूएस प्रमाणपत्र
  • NCC प्रमाणपत्र

ठाणे पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा

ठाणे पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा ही शंभर गुणांची होईल ज्यामध्ये उमेदवारांना 40 टक्के गुण घ्यायचे आहेत म्हणजे शंभर पैकी 40 गुण हे उमेदवारांना घ्यायचे आहेत ही या परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटांचा असेल ठाणे पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेसाठी विषयानुसार गुणांची मांडणी खालच्या टेबल मध्ये केली आहे.

विषयमार्क
मराठी व्याकरण20 मार्क
चालू घडामोडी20 मार्क
गणित20 मार्क
बुद्धिमत्ता चाचणी20 मार्क
वाहन चालवणे20 मार्क
एकूण मार्क100 मार्क

ठाणे पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF:168 सेमी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी

पोलीस शिपाई शारीरिक चाचणी

क्रियापुरुषमहिलागुण
धावणे1600 मीटर800 मीटर20
100 मीटर100 मीटर15
गोळा फेक15
टोटल50

पोलीस शिपाई चालक शारीरिक चाचणी

क्रियापुरुषमहिलागुण
धावणे1600 मीटर800 मीटर30
गोळा फेक20
टोटल50

Leave a comment

Exit mobile version