आजचे कापसाचे बाजार भाव, दि.20/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन कापूस भावामध्ये. शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समिती जेथे कापसाला सर्वोच्च बाजार भाव मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे भाव कधी वाढत आहेत तर कधी कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या कन्फ्युज होत आहेत की कापूस कधी विकायचा. मागच्या हप्त्यामध्ये सोमवारी कापसाचे(8300रु.) अचानक भाव वाढले होते आणि शनिवारी कापसाचे(8125रु.) भाव अचानक कमी झाली होत. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस कधी विकावा याचं काही सूत्र कळत नाही. महाराष्ट्रातील जवळपास बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7500 रुपये प्रतिक्विंटल ते 7800 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. त्यामुळे 85% शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. आता फक्त 15% कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. तर मग चला जाणून घेऊया पुढील काळामध्ये कापसाचे भाव वाढतील का? आणि आज कापसाला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये किती दर भेटला.

आजचे कापसाचे बाजार भाव

आजचे कापसाचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये 4 अशा बाजार समिती आहे जेथे कापसाला सर्वोच्च दर मिळत आहे. जर त्या बाजार समितीत तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वप्रथम अकोला, अकोट, देऊळगाव राजा, मानवत आणि परभणी मित्रांनो या 4 बाजार समिती असे आहेत जेथे कापसाला सर्वोच्च दर मिळत आहेत. या 4 बाजार समिती पैकी आकोट या बाजार समितीमध्ये काल 8345 रुपये प्रतिक्विंटल एवढा जास्तीत जास्त कापसाचे भाव नोंदवला आहे. याच प्रकारे परभणी बाजार समितीमध्ये सुद्धा मागच्या सोमवारी कापसाला 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. यानुसार तुम्ही समजू शकता की कापसाचे भाव कधी वाढत आहे त्यात कधी कमी होत आहेत.

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?, लगेच तारीख पहा, PM Kisan Yojana 17th installment

बाजार समितीजास्तीत जास्त दर
अमरावती7575 रु.
सावनेर7350 रु.
पारशिवनी7400 रु.
जामनेर7200 रु.
अकोला7700 रु.
अकोला (बोरगावमंजू)8194 रु.
देऊळगाव राजा7950 रु.
काटोल7500 रु.
सिंधी(सेलू)7725 रु.
परभणी8000 रु.
मानवत8000 रु.
आकोट8345 रु.
फुलंब्री8200 रु.

Cotton Rate Today

Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास 85 टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विकलेला आहे आता फक्त शेतकऱ्यांकडे 15 टक्के कापूस एवढा शिल्लक आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस वाढण्याचे चान्सेस हे शंभर टक्के वाढले आहेत येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कापसाचे भाव 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जाऊ शकतात. मित्रांनो 18 मार्च रोजी सोमवारी कापसाला 8335 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत होता. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहेत. त्याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रातील बाजार समितीवर पडत आहे. महाराष्ट्रातील सर्व व्यापारी लोक चांगल्या प्रकारचा कापूस विकत घेण्यासाठी धडपड करीत आहेत. कारण व्यापाऱ्यांना माहित आहे की येत्या काळामध्ये कापसाचे दर पुन्हा वाढणार आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा व्यापारी लोक जास्त पैशाने कापूस विकत घेत आहेत. सध्या शासनाने कापसाला 7020 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव दिलेला आहे.

दुष्काळ अनुदान भरपाई, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान वाटप, यादी पहा, दुष्काळ यादी 2023, Dushkal Yadi 2023

पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023

1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.20/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”

Leave a comment

Exit mobile version