मोफत शिलाई मशीन योजना 2024, शिलाई व पिकोफॉल मशीनसाठी 100% अनुदान, अर्ज कुठे करायचा, Free Silai Machine Yojana 2024

Silai Machine Yojana 2024 नमस्कार महिला मंडळ तुमच्यासाठी आज एक जबरदस्त योजना घेऊन आलेलो आहे. महिला मंडळ शासन तुमच्यासाठी मोफत शिलाई मशीन आणि मोफत पिको फॉल मशीन ही योजना राबवत आहे. या योजनेपासून तुम्हाला शिलाई मशीन वर आणि पिको फॉल मशीन वर 100% अनुदान मिळणार आहे. सदर योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असून राज्यातील सर्व अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील महिलांसाठी ही योजना राबवल्या जात आहे. या योजनेअंतर्गत अगदी मोफत शिलाई मशीन व पिको फॉल मशीन,पिठाची गिरणी, पापड मशीन महिलांना दिल्या जाते. व यासोबतच समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय नागरिकांसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे या योजना सुद्धा राबवल्या जातात.

मोफत शिलाई मशीन योजना 2024

मोफत शिलाई मशीन योजना 2024

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याकरिता समाज कल्याण विभागाच्या वतीने मोफत शिलाई मशीन योजना राबवल्या जात आहे. या योजना अंतर्गत महिलांना 100% अनुदानावर शिलाई मशीन दिल्या जाते. व त्यासोबत पिको फॉल मशीन सुद्धा दिले जातात. यासाठी महिला मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये मोडल्या पाहिजेत. जिल्हास्तरीय समाज कल्याण विभागामार्फत महिलांना शिलाई मशीन व पिको फॉल मशीन वरती अनुदान दिले जाते जेणेकरून मागासवर्गीय प्रवर्गातील महिला सुद्धा काम धंद्याच्या मार्गातून समोर येऊन स्वतःचे आणि स्वतःच्या मुला-बाळांचे चांगले जीवन व्हावे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

मोबाईल शिलाई मशीन योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागतात.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कुठे करावा

मोफत शिलाई मशीन योजना करिता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्व महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडे जायचे आहे. तिथे गेल्यास एका विशेष अधिकाऱ्याला सविस्तर माहिती विचारून घेऊन हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. त्यानंतर तो अधिकारी तुम्हाला सर्व कागदपत्रे, पात्रता वगैरे पूर्तता करून घेईल आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल.

मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन योजना, 100% अनुदान, लवकर करा अर्ज, Free Silai Machine Yojana 2024

बोरवेल अनुदान योजना, शेतकऱ्यांना फुकट मिळणार बोरवेल त्यासोबत पंप सुद्धा, अर्ज कसा करायचा पहा?, Borewell Anudan Yojana

1 thought on “मोफत शिलाई मशीन योजना 2024, शिलाई व पिकोफॉल मशीनसाठी 100% अनुदान, अर्ज कुठे करायचा, Free Silai Machine Yojana 2024”

Leave a comment

Exit mobile version