Namo Shetkari Yojana 2nd Installment नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र जिल्ह्यातील यवतमाळ येथून वितरित करण्यात आलेले आहे, शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता हा एकाच वेळी शेतकऱ्यांना मिळाला आहे. यावेळी जवळपास नमो शेतकरी योजना अंतर्गत 3792 कोटी जवळ जवळ 88 लाख शेतकऱ्यांना वितरित केल्या गेले आहेत. तरी बऱ्याच लाभार्थ्यांना नमो योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळाला नाही आणि त्याबरोबरच पीएम किसान योजनेचा 16 हप्ता सुद्धा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे तर चला पाहून घेऊया.
का नमो शेतकरी योजनेच्या हप्ता मिळाला नाही?
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता का नाही मिळाला याचे मी तुम्हाला आज कारण सांगणार आहे. सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दिवाळीमध्ये पहिला हप्ता भेटला होता अशा शेतकऱ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजना अंतर्गत 4000 हजार रुपये 28 फेब्रुवारीला मिळणार होते. तर या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना हा 4 हजार रुपय मिळाले आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे 4000 हजार रुपये मिळाले नाहीत. तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी रोजी महाडीबीटी च्या माध्यमातून फक्त एक बटन क्लिक करून पीएम किसान योजनेचे सहसकट वाटप करण्यात आले होते. परंतु राज्य शासनाचे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या वितरणाची प्रक्रिया ही महाराष्ट्र सेंट्रलाइज बँकेद्वारे होत असल्यामुळे या प्रक्रियेस वेळ लागून हप्त्याचे पैसे संपूर्ण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसाचा वेळ लागत आहे आहे.
तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दिवाळीमध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता भेटला होता तर तुम्हाला हे चार हजार रुपये भेटतील आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पहिला हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपये भेटतील आणि यानंतर पुढच्या हप्त्यांमध्ये तुम्हाला चार हजार रुपये दिले जातील.
लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ये e-kyc करून घ्यावी आणि त्याबरोबरच आधार लिंकिंग बँक लिंकिंग बायोमेट्रिक पद्धतीने जवळच्या सीएससी केंद्र मध्ये जाऊन खात्रीशीर करून घ्यावी आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्या जातील