Bandhkam Kamgar Yojana 2024 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका लेखांमध्ये तर तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला मोफत भांडी सेट शासनाद्वारे मिळत आहे ज्यामध्ये तुम्हाला तीस घरगुती वस्तू अगदी मोफत मिळत आहेत तर तुम्हाला याबाबत आम्ही सर्व माहिती देणार आहोत मोफत भांडी संचामध्ये कामगारांना कोणत्या कोणत्या 30 घरगुती वस्तू मिळणार आहेत याबाबत आम्ही सर्व माहिती दिली आहे त्यानंतर या योजनेसाठी बांधकाम कामगारांनी कसा अर्ज करावा? कोठे अर्ज करावा आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याची सगळी माहिती आम्ही खाली दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला हा सर्व लेख वाचणे खूपच गरजेचे आहे. तर चला मग सुरु करूया पाहूया बांधकाम कामगारांना शासन काय देत आहे.
बांधकाम कामगार योजना 2024
तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक नवीन जीआर सादर केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना घरगुती वस्तू संच वितरण देण्यास मंजुरी दिली आहे. तर मित्रांनो इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना नवीन नवीन बांधकाम करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी जावे लागते. त्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी ते कामासाठी गेले तेथे त्यांना स्थलांतरित व्हायला बराच कालावधी लागतो, त्या ठिकाणी नव्याने निवास, पाल्याचे शिक्षण, आरोग्य विषयक समस्या व भोजन याबाबत जुळून घ्यावे लागते. त्यामुळे शासनाने त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीमध्ये जिवंत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये ज्या कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केली होती अशा बांधकाम कामगारांना हा भांडी संच अगदी मोफत दिल्या जाणार आहे.
कामगारांसाठी खुशखबरी! कामगारांना मिळणार 10 हजार रुपये, सन्मान धन योजना, Sanman Dhan Yojana 2024
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कसा करावा
बांधकाम कामगार योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त ज्याला आपण जिल्हा कार्यकारी अधिकारी/ सरकारी कामगार अधिकारी असे म्हणतो या ठिकाणी जाणे खूप गरजेचे आहे. किंवा सर्वात सोपे डब्ल्यू एफ सी ऑफिस(WFC Office) मध्ये जाऊन तुम्हाला यांच्याकडे अर्ज भरून द्यायचा आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि प्रपत्र हे महत्त्वाचे कागदपत्रे लागतील. घरगुती भांड्याचा संच भेटल्यानंतर तुमचे छायाचित्र काढले जाईल व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेतले जाते.
कामगारांना कोणता भांडी संच मिळणार?
घरगुती भांडी वस्तू | एकूण किती? |
ताट | 04 |
वाट्या | 08 |
पाण्याचे ग्लास | 04 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
मोठा चमचा(भातवाडी) | 01 |
मोठा चमचा(वरणवाडी) | 01 |
पाण्याचा जग | 01 |
मसाला डब्बा | 01 |
डब्बा झाकणासह(14 इंच) | 01 |
डब्बा झाणासह(16 इंच) | 01 |
डब्बा झाकण्यासह(१८ इंच) | 01 |
परात | 01 |
प्रेशर कुकर | 01 |
कढाई | 01 |
तुमची टाकी | 01 |
कोणत्या कामगारांना मिळणार भांडी संच?
कामगारांना भांडी संच मिळवण्याकरिता सर्वप्रथम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी असणे फार गरजेचे आहे. ज्या लाभार्थ्यांनी कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणी केली नसेल त्यांनी हा खालील व्हिडिओ पाहून घ्यावा आणि त्याच प्रमाणे स्वतःची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी करून घ्यावी. त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळेल.