अहमदनगर खरीप पिक विमा मंजूर? लवकर यादी पहा, 160 कोटीचा निधी मंजूर Ahmednagar Pik Vima List 2023

Ahmednagar Pik Vima List 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पिक विमा संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने अखेर 75% पिक विमा मंजुरी दिली आहे आणि याचा GR कालच जाहीर झाला आहे. यामध्ये एकूण 16 जिल्हे पात्र आहे. ज्यांच्यासाठी जवळपास 1800 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे. या जीआर मध्ये जवळपास 35 लाख शेतकरी पात्र आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रातून 16 जिल्ह्यातील आहेत. आज आपण अहमदनगर पिक विमा संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास किती शेतकरी पात्र आहेत? आणि त्यांच्यासाठी किती कोटीचा निधी मंजूर केला आहे? याबद्दल आपण या लेखांमध्ये चर्चा करणार आहोत.

अहमदनगर खरीप पिक विमा

अहमदनगर खरीप पिक विमा

शेतकरी मित्रांनो अहमदनगर मधील जवळपास 2,31,831 एवढे शेतकरी पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी जवळपास 160.28 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे अहमदनगर मधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा काढलेला होता त्यांना 26 फेब्रुवारी रोजी 75% पिक विमा वितरित करण्यात येणार आहे.

75% खरीप पिक विमा 2023 यादी जाहीर

शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा 2023 ची यादी मान्य झाली आहे आणि त्याचा एक जीआर सुद्धा आलेला आहे. ज्यामध्ये एकूण 16 जिल्हे पात्र आहेत आणि यामध्ये जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो आपलं सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी अडचणीच्या वेळेस धावून येतं. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती जसे गारपीट, पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, कोरडा दुष्काळ यांच्यापासून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना ते आर्थिक मदत देत, ज्यामुळे शेतकऱ्याचे जीवन स्थिर होते. शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा विमा काढलेला होता अशा सर्व शेतकऱ्यांना खरीप पिक विमा भेटणार आहे. खरीप पिक विमा 2023 ची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध झाली आहे आणि याच्यासाठी जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना 75% विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.

Leave a comment

Exit mobile version