कापसाचा भाव वाढणार का? सध्या परभणीत 7400 रुपये प्रति क्विंटल कापूस विकल्या जातोय, Cotton Rate Today

Cotton Rate Today : शेतकऱ्यांनी 2023-2024 यावर्षी मोठा दुष्काळ सहन केला आहे आणि त्याबरोबरच पिकांना सहजासहजी चांगला भाव नाही मिळाल्याने जगाचा पोशिंदा आता खूपच वैतागला आहे त्यामुळे बरेच शेतकरी सध्या कंटाळून गेले आहेत. कापसाला सध्या परभणीत 7,400 रुपये हा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आलेला आहे. त्यामुळे आता कापसाला भाव वाढेल का? हा कापूस जपून ठेवावा का? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या पडत आहे. याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत की कापसाला भविष्यामध्ये किती भाव वाढेल कापूस हा 10,000 हजार रुपये पेक्षा जास्त विकेल का याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. तर चला जाणून घेऊया सगळं काही.

सध्या कापसाचा भाव किती आहे?

यंदा झालेल्या कमी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान सुद्धा झाले आणि शेतकऱ्यांना तेवढी नुकसान होऊन सुद्धा चांगले भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी वैतागून गेली आहेत. परंतु सध्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला कापसाचे दर वाढत जात आहेत. सध्या बुलढाणा येथील देऊळगाव राजा येथे 7500 रुपये हा जास्तीत जास्त कापसाला दर लागत आहे आणि त्याबरोबरच परभणी येथे 7400 रुपये हा जास्तीत जास्त दर लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आलेला आहे. सध्या कापसाचा भाव 7000 रुपये प्रति क्विंटल च्या पेक्षा जास्त असल्याने शेतकरी सध्या खुश नजर येत आहेत.

कापसाचा भाव वाढणार का?

कापसाचा भाव वाढणार का?

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांची पीक जागेवरच जिरून गेली आणि त्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे सुद्धा होते तेवढे पीक वाहून गेले. त्यामुळे जिथे एकरी 12 क्विंटल कापूस होणार तिथे फक्त 5 क्विंटल कापूस झाला त्यामुळे शेतकऱ्यांना येथे मोठा घाटा सहन करावा लागत आहे आणि त्याबरोबरच कवडीच्या दराने कापूस भाव विकल्या जात असल्याने शेतकऱ्याचे केलेल्या कष्टाचे सुद्धा फळ मिळत नाही त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. परंतु फेब्रुवारीच्या आखरीच कापसाचे भाव वाढत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच काही तज्ञांनी असं सांगितलं आहे फेब्रुवारी नंतर मार्च आणि एप्रिलमध्ये शेतकऱ्यांना 7 हजार पेक्षा जास्त भाव भेटू शकतो. त्यामुळेही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.

Leave a comment

Exit mobile version