Shetkari Karjmafi 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका बातमीमध्ये. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबरी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. शेतकऱ्यांचे आता दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे. हे कर्ज 2019 पासूनच्या थकीत कर्जावरील आहे. नुकतीच राज्य सरकारने एक नवीन जीआर जाहीर केला ज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळेल? कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल? आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही?
याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. या माहितीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नुकत्याच आलेल्या जीआर नुसार कर्जमाफीची यादी 1 मार्च 2024 रोजी जाहीर होणार आहे. यामध्ये 98 लाख शेतकरी पात्र असणार आहेत आणि त्याबरोबरच यामध्ये 28000 कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केल्या जाईल. तर चला याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana 2024- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2024
शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत जून 2019 या वर्षांमध्ये घेतलेले कर्ज किंवा थकीत असलेले कर्ज व्याजासह दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे 20 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारची मागणी मान्य केली आणि त्याबरोबरच निवडणुकीपूर्वी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.
महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत कर्जमाफीची यादी 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी अल्प व अत्यल्प शेतकरी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी अर्ज करू शकतात. या योजनेसाठी राज्य सरकारने 28000 कोटी रुपयांची बजेट निश्चित केली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी कधी जाहीर होणार?- Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana List
या योजनेअंतर्गत शासनाने लाभार्थ्याची पहिली यादी जाहीर करण्यासाठी 1 मार्च 2024 ही तारीख निवडलेली आहे. ही यादी पाहण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक, ग्रामपंचायत किंवा त्यांच्या सरकार सेवा केंद्राला भेट देणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत 98 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे असतील. जर लाभार्थ्यांचे नाव पहिल्या यादीत नसेल तर चिंता करण्याचा विषय नाही. त्यांचे नाव दुसरे यादीत येऊन जाईल. या योजनेमध्ये ऊस, फळे यासह इतर पारंपारिक शेती करणाऱ्या इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2024 अंतर्गत समाविष्ट केली जाणार आहे. कर्जमाफीसाठी कोणतीही अट नसणार आहे.
या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही
- ज्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या वर्षी लाभ मिळाला होता अशांना का लाभ नाही
- राज्यातील मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सदस्यांना कर्जमाफी नाही
- केंद्र व राज्य सरकारचे सर्व कर्मचारी ज्यांचे वेतन 25 हजार पेक्षा जास्त आहे
- राज्य सार्वजनिक उपक्रम व अनुदानित संस्था यांचे कर्मचारी असे सुद्धा वगळण्यात येणार आहेत
- जे शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नातून पैसे मिळतात अशा व्यक्तींना सुद्धा कर्ज नाही
- निवृत्ती वेतनधारक व्यक्ती यांचे मासिक वेतन 25 हजार पेक्षा जास्त असेल अशांना सुद्धा नाही
- कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी स्वीकार गिरणी नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी यांना सुद्धा नाही
- पी-एम किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार? PM Kisan Yojana 16th Installment Date
- आता मिळणार मोफत वीज! मोदींनी सुरू केली सूर्य घर योजना | असा करा अर्ज | PM Surya Ghar Yojana
कोणत्या बँकेला या योजनेचा लाभ मिळेल?
- राष्ट्रीयकृत बँक
- खाजगी बँक
- जिल्हा मध्यवर्ती बँक
- सहकारी बँक
- ग्रामीण बँक
2 thoughts on “महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी नवीन यादी जाहीर लगेच पहा Shetkari Karjmafi 2024”