Namo Shetkari Yojana 2nd Installment केंद्र शासनाचा आदर्श घेऊन राज्य शासनाने सुद्धा वार्षिकी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात निर्णय घेतला होता आणि त्यानंतर या योजनेसाठी त्यांनी नमो शेतकरी योजना ही जबरदस्त योजना आखली होती. या योजनेचा पहिला हप्ता 28 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेला होता. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा जीआर राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर झाला होता. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा या गोष्टीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत दिली. आता हा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची माहिती आपण घेणार आहोत.
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार?
केंद्र शासनाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनाच्या अधिकृत वेबसाईट वरती पीएम किसान योजनेचा सोहळा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याची माहिती दिली होती. तुम्हाला माहीत असेलच की पी-एम किसान योजनाचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 जमा होणार आहे. त्यानंतर लगेचच राज्य शासनाने सुद्धा यावर निर्णय घेतला आणि 1792 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि याची माहिती जीआर द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचविली. नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2024 च्या आखरीपर्यंत मिळणार असल्याची माहिती सुद्धा सरकारने दिली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बोलण्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यात जमा करण्यात येईल.
हे पण वाचा:
- नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या दिवशी मिळणार? लवकर पहा GR | Namo Shetkari Yojana 2nd Installment
- पीएम किसान योजना 16वा हफ्ता कधी जमा होणार? अखेर केंद्रीय शासनाकडून तारीख जाहीर | PM Kisan Yojana 16th Installment Date
नमो शेतकरी योजनेसाठी एवढा निधी मंजूर
राज्याची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नमो शेतकरी योजने चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी आणि केव्हा जमा होईल याची माहिती दिली आहे. कृषिमंत्री संजय मुंडे यांच्या बोलल्यानुसार नमो शेतकरी योजनेसाठी 90 लाख शेतकरी पात्र असून जवळपास 1792 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. याआधी 28 ऑक्टोबर 2024 रोजी 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास 1720 कोटी रुपये वितरित केले होते. यानंतर ज्या शेतकऱ्यांना पहिल्या हप्ता मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता पहिला आणि दुसरा हप्ता सोबत मिळणार आहे. त्यासाठी ही शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होऊन जाईल.
2 thoughts on “नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? तारीख पहा लवकर, Namo Shetkari Yojana 2nd Installment”