प्रधानमंत्री वय वंदना योजना, वयोवृद्धांना(म्हाताऱ्या) मिळणार पेन्शन,PM Vaya Vandana Yojana

PM Vaya Vandana Yojana: नमस्कार मित्रांनो तुमचं अजून एका नवीन योजनेमध्ये स्वागत आहे. मित्रांनो जर तुमच्याही घरामध्ये ज्येष्ठ नागरिक त्यांचे वय 60 किंवा 60 वर्ष त्हून अधिक असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना एक पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत तुम्हाला काही रक्कम गुंतवणे आवश्यक आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एका निश्चित कालावधीमध्ये उदाहरणार्थ 10 वर्ष नियमित पगार मिळणार असतो. यासाठी तुम्ही एक महिना, तीन महिने, सहा महिने किंवा आठ महिन्याचा वार्षिक पेन्शन निवडू शकता. या योजनेची अंतिम तारीख 31 मार्च दिलेली आहे तत्पूर्वी तुम्ही सर्व नियम आणि अटी वाचून घ्याव्या. या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज सुद्धा उचलू शकतात.

प्रधानमंत्री वय वंदना योजना व्याज दर

प्रधानमंत्री वय वंदना योजना व्याज दर

जर तुम्ही मासिक पेन्शन निवडले असेल तर तुम्हाला गुंतवलेल्या रक्कमेचे 7.40% व्याज व्याज पुढील 10 वर्षांमध्ये पेन्शनच्या स्वरूपात मिळेल. जर तुम्ही तिमाही पेन्शन निवडले असेल तर तुम्हाला गुंतवलेल्या रकमेचे 7.45 टक्के व्याजदर पुढील दहा वर्षांमध्ये पेन्शनच्या स्वरूपात मिळेल आणि जर सहामाही पेन्शन निवडले असेल तर तुम्हाला पुढील दहा वर्षांमध्ये 7.52% व्याजदर पुढील दहा वर्षांमध्ये पेन्शनच्या स्वरूपात मिळत राहील आणि जर तुम्ही वार्षिक पेन्शन निवडला असेल तर तुम्हाला 7.60% व्याजदर पुढील दहा वर्षांमध्ये पेन्शनच्या स्वरूपात मिळत राहील. या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा वर्षासाठी 8% पर्यंत सुद्धा व्याजदर मिळत असतं, यामध्ये तुम्हाला मृत्यू लाभ, कर लाभ आणि कर्ज सुविधा सुद्धा भेटतात.

प्रधानमंत्री वय वंदना योजना पात्रता

प्रधानमंत्री वय वंदना योजना अंतर्गत जर तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही ही योजना पाहत असाल तर सर्वप्रथम ते ज्येष्ठ नागरिक भारताचे नागरिक असणे खूप गरजेचे आहेत. त्यांचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी या अगोदर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेतला नसता पाहिजे आणि इतर पेन्शनचे सुद्धा सदस्य नसले पाहिजेत. इतक्या गोष्टी प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी महत्त्वाचा आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजना अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अर्ज करू शकतात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला जवळच्या एलआयसी शाखेत जावं लागेल सर्व कागदपत्रे घेऊन. प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र लागतील ते आम्ही खाली दिलेली आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र

प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड तर लागेलच त्यानंतर पॅन कार्ड, वय प्रमाणपत्र, पत्ता, बँक खाते पुस्तक, मोबाईल नंबर इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या लागतील.

सूक्ष्म सिंचन आणि वैयक्तिक शेततळे करिता 160 कोटीचा निधी मंजूर, पहा किती अनुदान मिळेल, Drip Irrigation Subsidy

तुर बाजार भाव दि.03/03/2024, जिल्ह्यांचा यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Tur Bajar Bhav

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.03/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate

1 thought on “प्रधानमंत्री वय वंदना योजना, वयोवृद्धांना(म्हाताऱ्या) मिळणार पेन्शन,PM Vaya Vandana Yojana”

Leave a comment

Exit mobile version