किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार 10 मिनिटात, Kisan Credit Card Yojana

Kisan Credit Card Yojana शेतकऱ्यांना कमी कठीणाईमध्ये लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. कारण की केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरवले आहे. या जिल्ह्यांमध्ये बीडचा समावेश आहे. ॲग्री स्टॉक या ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपयापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे कर्ज विनाकारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्र मधील बीड आणि उत्तर प्रदेश राज्यातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये फक्त किसान क्रेडिट कार्ड चा प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मे पासून राबविण्यात येणार आहे. तर मग चला याबाबत सर्व काही माहिती घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड योजना 2024

किसान क्रेडिट कार्ड या योजनेमध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ॲप विकसित करण्यात आली आहे. ज्याचे ॲग्री स्टॉक असे नाव आहे. या ॲपच्या माध्यमातून केंद्र शासनाने देशातील एकाच ॲप मधून पिकांची नोंदणी करायची ठरविले आहे. खरीप हंगामापासून देशभरात या ॲपवर पिकांची नोंदणी केली जाणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार? तारीख पहा, Namo Shetkari Yojana 4th installment

किसान क्रेडिट कार्ड योजना 2024

किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये पात्र होण्यासाठी सर्वप्रथम सातबारा उतारे आधार क्रमांक अशी जोडणी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्यात आली आहे. तसेच सर्व जमीन नोंदणी तपासण्यात येऊन त्याची सातत्याने पडताळणी केली आहे. पिक पाहणी व जमीन नोंदीच्या माहितीचा आधार घेऊन बीड व फारुखाबाद या दोन्ही जिल्ह्यातील सातबारा उतारे आधार क्रमांक अशी सलग्न करण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 65 टक्के सातबारा उतारे आधार कार्ड सोबत जोडण्यात आली आहेत. कर्ज देण्याचे प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या दृष्टीने केंद्र शासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत येत्या मे महिन्यात या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रिया

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ॲग्री स्टॉक ही ॲप डाऊनलोड करायची आहे त्यानंतर ॲप डाऊनलोड केल्यानंतर नाव आणि आधार क्रमांक टाकल्यावर ओटीपी पडताळणी होईल फेस अयडीच्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटवण्यात येईल.

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, पिक विमा कधी मिळणार, जिल्ह्यानुसार यादी पहा, Crop Insurance 2023

किसान क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रिया

मग या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी भरल्यानंतर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बँकेच्या कर्जाची ऑफर दिसेल तिथून शेतकरी हे कर्ज उचलू शकतात. एक ऑफरवर क्लिक करून दहा मिनिटात प्रक्रिया करून कर्ज जमा होईल. क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून एक लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्जाला कोणतेही व्याज नाहीये.

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ(जीआर) निर्णय पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra

2 thoughts on “किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार 10 मिनिटात, Kisan Credit Card Yojana”

Leave a comment

Exit mobile version