Kapus Bajar Bhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा पाहणार आहोत की महाराष्ट्र मध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला बाजार भाव लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजार भाव हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रश्न पडत आहे की कापूस विकावा का नाही. कारण की 75 टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे आणि आता फक्त 25 टक्के कापूस शेतकऱ्यांचे कडे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना असा प्रश्न निर्माण होत आहे की भविष्यामध्ये म्हणजे येत्या दोन तीन महिन्यामध्ये कापसाचे भाव वाढतील का नाही?, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. काल रविवार असल्याने महाराष्ट्रातील बऱ्याच बाजार समित्या बंद होत्या तरीसुद्धा आम्ही ही कापसाची माहिती तुमच्यापर्यंत आणलेली आहे. तरीही तुम्ही काळजीपूर्वक नीट वाचावी.
आजचे कापसाचे बाजार भाव दि.04/03/2024
सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला सरासरी दर हा 7300 ते 7500 रुपया पर्यंत मिळत आहे आणि कापसाला सर्वोच्च दर हा मागील फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यापासून वाढलेला आहे. हा जास्तीत जास्त 8100 रुपया पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरली आहे. या 15 ते 20 दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विकलेला आहे. फेब्रुवारीचे दुसरे हत्या पासून कापसामध्ये 10% भाव वाढ पाहायला मिळाली आहे. कापूस तज्ञांच असे म्हणणे आहे की पुढील काळात मे महिन्यापर्यंत या दरामध्ये अजून 5% भाववाढ होऊ शकते. तुम्हाला जर जिल्ह्यानुसार बाजार समितीचा बाजार भाव पाहायचा असेल तर खाली दिलेल्या टेबल नुसार सर्व माहिती वाजून घेणे.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7200 रु. |
मानवत | 7850 रु. |
देऊळगाव राजा | 8000 रु. |
अकोला | 7850 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 8000 रु. |
भद्रावती | 7200 रु. |
उमरेड | 7300 रु. |
वारोरा-माडेली | 7350 रु. |
(सिंधी) सेलू | 7600 रु. |
फुलंब्री | 7200 रु. |
वडवणी | 7600 रु. |
हिंगणघाट | 7700 रु. |
Kapus Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन ते चार बाजार समित्या प्रसिद्ध आहे. जेथे कापसाला सर्वोच्च भाव मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो त्या बाजार समिती कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम परभणी येथील मानवत बाजार समिती जिथे कापसाला 8000 हजार पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत होता. त्यानंतर देऊळगाव राजा येथे कापसाला प्रति क्विंटल 8100 रुपये दर मिळत होता. त्यानंतर अकोला बोरगावमंजू शेतकरी मित्रांनो येथे सध्या कापसाला 8000 हजार प्रति क्विंटल दर मिळत आहे. व्यापारी लोकांमध्ये कापूस विकत घेण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढत चाललेले आहेत आणि याचा फायदा राज्यातील व्यापाऱ्यांना होत आहे. भविष्यामध्ये कापसाचे दर वाढू शकतात हे सर्व गणित सध्या कापूस तज्ञांना माहित झालेला आहे. त्यामुळे सध्या कापसाला चांगला दर मिळत आहे.
Disclaimer
दिनांक 03/03/2024 रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच बाजार समित्या बंद असल्यामुळे आम्ही पुरेपूर माहिती देऊ शकलो नाही. वरच्या टेबल मध्ये जे दर दिली आहेत ते 2 मार्च आणि 1 मार्च या तारखेचे आहेत त्यामुळे गैरसमज वाटून घेऊ नका. हे भाव याच दराच्या मागेपुढे असतील असे आम्ही अपेक्षा करू.