Weather Update नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण सगळीकडे पसरलेली आहेत. तर कुठे कुठे जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट सुद्धा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आढळून येते. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये तुरळ ठिकाणी गारपिटीचा इशारा आणि पावसाचा इशारा दिला आहे.
आजचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपीटीची आणि अवकाळी पावसाची तुरळक ठिकाणी हजरी पाहायला मिळत आहे. यासोबतच महाराष्ट्र मध्ये दिवसेंदिवस टेंपरेचर सुद्धा वाढत जात आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे 38.2 C पर्यंत टेंपरेचर पोहोचली आहे आणि त्यासोबत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा आयएमडी विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते की काय असे होत आहे. सध्या रब्बी हंगामाची काढणी तोंडाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बीचे पीक जसे की गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची कापणी करून शेतामध्ये जशास तसे ठेवली आहे. अशा शेतकऱ्यांना ही खूपच महत्त्वाची बातमी आहे.
सध्या महाराष्ट्र मध्ये बऱ्याच भागामध्ये गारपीट आणि वादळी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, केळी, हरभरा, मका आणि ज्वारी भोई सपाट झालेली आहे आणि त्याबरोबरच मार्च महिना सुरू झाल्याने पुन्हा ते टेंपरेचर सुद्धा वाढत चाललेला आहे. रत्नागिरी, मालेगाव, परभणी, वाशिम, रत्नागिरी येथे 37C अंशाचा पारा गाठला आहे. तापमानासोबत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पसरला आहे आणि संध्याकाळच्या सुमारास पाऊस येण्याची दाट शक्यता सुद्धा हवामान खात्याने नोंदवली आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ याची नोंद आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यामध्ये वादळी पावसाचा गारपीटीचा इशारा म्हणजे येल्लो अलर्ट या जिल्ह्यामध्ये सांगितला गेला आहे. ज्यामध्ये जळगाव संभाजीनगर जालना आणि परभणी हे सर्व जिल्हे आहेत. येथे येल्लो अलर्ट आणि वादळी पावसाचा गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.03/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate
आणि त्याचबरोबर वादळी पावसाचा इशारा येल्लो अलर्ट अजून काही जिल्ह्यांना दिला आहे. पण येथे गारपीटीचा इशारा नोंदवला गेला नाहीये. त्यामध्ये सर्वप्रथम धुळे बीड हिंगोली नांदेड अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे जिल्हे आहेत. हे जिल्हे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मधील असून त्या सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.