Dushkal Yadi 2023 दुष्काळ यादी 2023 शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. राज्यामध्ये जवळपास 43 तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ मंजूर केलेला आहे आणि याचे पैसे देखील सध्या राज्य शासनाकडून जिल्हास्तरीय कार्यालयाकडे पाठवलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो जिल्हास्तरीय कार्यालय आता या 43 तालुक्यांमध्ये हे पैसे पाठवतील आणि त्यानंतर राज्य शासनाकडून पाठवलेले हे दुष्काळाचे अनुदान शेवटी तुमच्या महसूल मंडळाकडे जमा होतील. शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातील ग्रामसेवकाकडे kyc करण्यासाठी शासनाकडून यादी पाठवलेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमची kyc करून घेणे गरजेचे आहे.
दुष्काळ निधीच्या अपडेटसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
त्यानंतर तुम्ही तिथून केवायसी वगैरे करून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो या 43 तालुक्यातील सर्व महसूल मंडळामध्ये केवायसी करण्यासाठी यादी पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घेणे आहे. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना या दुष्काळ अनुदानामध्ये किती रुपयाचा निधी मिळणार आहे तर शेतकऱ्यांनो तुम्हाला 3 हेक्टर पर्यंत मदत मंजूर झालेली आहे आणि पर हेक्टर तुम्हाला 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये देण्यात येणार आहे. तर 50% पेक्षा जर तुमचे शेती पिकाचे नुकसान झाले असेल आणि जर तुम्ही व्यवस्थित पंचनामे केली असतील तर तुम्ही या दुष्काळ यादीमध्ये पात्र आहात. तर मग चला पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मंजूर झालेला आहे.
दुष्काळ यादी 2023
शेतकरी मित्रांनो 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये हा दुष्काळ निधी मंजूर केला आहे. शेतकरी मित्रांनो या दुष्काळ निधीसाठी शासनाने तब्बल 2100 कोटी 87 लाख रुपयांचा निधी जवळपास 37 लाख 52 हजार 903 शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे. या निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्च 2024 रोजी किंवा जर शेतकऱ्यांची kyc उशिरा झाली असेल तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुष्काळ यादी चे पैसे जमा होतील. शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.
पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023
Sr.No | दुष्काळग्रस्त जिल्हे | शेतकरी लाभार्थी संख्या | मंजूर निधी |
1) | नाशिक | 3,50,000 | 155.74 कोटी |
2) | जळगाव | 16,921 | 4 कोटी 88 लाख |
3) | अहमदनगर | 2,31,831 | 160 कोटी 28 लाख |
4) | सोलापूर | 1,82,534 | 171 कोटी 41 लाख |
5) | सातारा | 40,406 | 6 कोटी 74 लाख |
6) | सांगली | 98,372 | 22 कोटी 4 लाख |
7) | बीड | 36,358 | 241 कोटी 21 लाख |
8) | बुलढाणा | 4,98,720 | 18 कोटी 39 लाख |
9) | धाराशिव | 4,98,720 | 218 कोटी 85 लाख |
10) | अकोला | 1,77,253 | 97 कोटी 29 लाख |
11) | कोल्हापूर | 228 | 13 लाख |
12) | जालना | 3,70,625 | 160 कोटी 48 लाख |
13) | परभणी | 4,41,970 | 206 कोटी 11 लाख |
14) | नागपूर | 63,422 | 52 कोटी 21 लाख |
15) | लातूर | 2,19,535 | 244 कोटी 87 लाख |
16) | अमरावती | 10,265 | 8 लाख |
17) | Total | 37 लाख 52 हजार 903 | 2100 कोटी 87 लाख |
3 thoughts on “दुष्काळ यादी 2023, हेक्टरी 24,000, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, KYC यादी पहा, Dushkal Yadi 2023”