Sukanya samriddhi yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त योजना घेऊन आलेलो आहोत. या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. जर तुमच्या मुलीचे वय सुद्धा 10 वर्षापेक्षा कमी असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेद्वारे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये भरायचे आहेत. त्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला 27 लाख रुपये भेटणार अशी ही योजना आहे. यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणते कोणते कागदपत्रे लागतात? आणि किती वर्षानंतर हे पैसे तुम्हाला काढता येतात? की सर्व माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे. ती सर्व माहिती मी वाचून घेणे बंधनकारक आहे.
सुकन्या समृद्धि योजना माहिती-Sukanya Samriddhi Yojana Information
सुकन्या समृद्धी योजना 2024 अंतर्गत मुलींच्या पालकाला कमीत कमी महिन्याला 250 रुपये ठेव ठेवता येते, आणि जास्तीत जास्त वर्षाकाठी 1.5 लाख रुपये ठेवता येते. ही रक्कम बचत खाते उघडण्यापासून ते 14 वर्षे पूर्ण होईपर्यंत भरणे बंधनकारक आहे. जर ही रक्कम तुम्हाला काढायची असेल तर जेव्हा मुलगी 10वी पास होईल किंवा अठरा वर्षाची होईल तेव्हा ही रक्कम काढू शकतात. जर तुम्ही महिन्याला 5000 हजार रुपये गुंतवले तर काही वर्षांनी जेव्हा मुलगी लग्नाच्या वयामध्ये येईल तेव्हा तुम्हाला जवळपास 27 लाख रुपये भेटू शकतात. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 वर्षाखालील सर्व जाती धर्माच्या मुली या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
सुकन्या समृद्धि योजना कागदपत्रे-Sukanya Samriddhi Yojana Documents
सुकन्या समृद्धी योजनेसाठी तुम्हाला सर्वप्रथम मुलीच्या जन्माचा दाखला हा लागेलच. त्यानंतर मुलीच्या पालकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, वीज बिल, मुलींच्या आई-वडिलांचे रहिवासी प्रमाणपत्र हे सर्व काही कागदपत्रे महत्त्वाचे लागतील. कागदपत्रांमध्ये हे सर्व कागदपत्रे मुलीच्या आई वडिलांचे असणे बंधनकारक आहे. जर मुलीचे आई-वडील नसतील तर अशा परिस्थितीमध्ये जे कोणी मुलीचे देखभाल करणारे असतील उदाहरणार्थ आजोबा-आजी, मामा ,मावशी तर हे कागदपत्रे त्या व्यक्तीची जोडणे आवश्यक आहेत.
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर-Sukanya Samriddhi Yojana Interest Rate
सुकन्या समृद्धी योजनाचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुलीचं खातं पोस्ट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडणं खूपच गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे व्याज असेल हे थोडं डिस्कस करूया. या बँक मध्ये तुम्हाला व्याजदर 8.2% प्रतिवर्ष एवढ असेल. हा व्याजदर नवीन वर्षापासून सुरू झालेला आहे. म्हणजे 01/01/2024 पासून हा नवीन व्याजदर सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच हा व्याजदर प्रत्येक वर्षी बदलत सुद्धा असतो. त्यानुसार वार्षिक आधारावर गणना केली जाते त्याला आपण वार्षिक चक्रवाढ असे सुद्धा म्हणतो.
सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर-Sukanya Samriddhi Yojana Calculator
मित्रांनो खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त रक्कम किती शिल्लक ठेवली जाऊ शकते तर याबद्दल नियम सांगतो की तुम्ही कमीत कमी 250 रुपये प्रति महिना आणि जास्तीत जास्त एका वर्षामध्ये 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. त्यानंतर तुम्ही एकही रुपया या बँक खात्यामध्ये टाकू शकत नाही.
सुकन्या समृद्धी योजनेच्या कॅल्क्युलेटर बद्दल बोललं जातं जर तुम्ही प्रति महिना 5,000 हजार रुपये जमा केले तर वर्षाकाठी ते 60,000 हजार रुपये होतात आणि समजा तुमची मुलगी आता 5 वर्षाची आहे आणि तुम्ही या योजनेमध्ये 2024 पासून इन्व्हेस्ट करायला सुरू केलं होतं. तर 2045 मध्ये तुमची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट 9 लाख रुपये एवढी होईल. त्याचा टोटल व्याजदर तुम्हाला 18 लाख 71 हजार 31 रुपये एवढे भेटल आणि तुम्हाला 2045 यावर्षी मुलीच्या लग्नासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी 27 लाख 71 हजार 31 रुपये एवढे भेटल्या जातील.
आणखी योजना बद्दल वाचा
- आता मिळणार मोफत वीज! मोदींनी सुरू केली सूर्य घर योजना | असा करा अर्ज | PM Surya Ghar Yojana
- प्रधान मंत्री पीक विमा योजना,2020-2022 नुकसान भरपाई साठी 11 कोटीचा निधी मंजूर, या दिवशी मिळणार विमा ? पिक विमा यादी पहा? Pik Vima
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता-Eligibility for Sukanya Samriddhi Yojana
या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी मुलीचे वय हे 10 वर्षापेक्षा कमी पाहिजे आणि खाते उघडण्यासाठी 10 वर्षाखालील मुलींच्या नावाने पालकाद्वारे खात उघडलं पाहिजे. मुलीच्या नावाने तुमच्या जवळपासच्या पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खाते उघडता येते. सुकन्या समृद्धी योजनेसाठी एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुली पात्र असतील. त्यानंतर जुळ्या तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाते उघडले जाऊ शकतात.
2 thoughts on “सुकन्या समृद्धी योजना, मुलींना मिळणार 27 लाख फक्त हे करा, सुकन्या योजना कागदपत्रे Sukanya samriddhi yojana 2024”