Namo Shetkari Yojana 2nd Installment केंद्र शासनाप्रमाणेच राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी योजनेची सुरुवात केली होती. पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांचे बँक खात्यावरती 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप होणार आहे. ही माहिती पी-एम किसान योजना या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर झाली. त्यानंतर लगेचच राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जवळजवळ 1792 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी राज्य सरकारकडून मिळाली आहे. 21 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांसाठी एक नवीन जीआर काढण्यात आला. या जीआर मध्ये नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी किती निधी मिळाला आहे आणि त्याबरोबरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत पोहोचेल याची माहिती दिली आहे. तर चला जाणून घेऊया हा निधी कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल आणि त्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत.
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळेल?
केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी योजनेची सुरुवात केली होती. या योजनेचा पहिला हप्ता 28 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या होता. त्यानंतर नमो शेतकरी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी जवळपास लाभार्थ्यांसाठी 1792 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी महाराष्ट्र शासन, कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासनाद्वारे निर्गमित केलेला असून 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा जीआर काढण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारी 2024 च्या अखेर पर्यंत मिळणार असल्याचा सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे 28 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होईल त्याचप्रमाणे फेब्रुवारीच्या अखेर अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
हे पण वाचा:
- पीएम किसान योजना 16वा हफ्ता कधी जमा होणार? अखेर केंद्रीय शासनाकडून तारीख जाहीर | PM Kisan Yojana 16th Installment Date
- Sugarcane Rate: उसाचे भाव वाढले शेतकऱ्यांना मोठी खुशखबरी! केंद्र सरकारने दिल गिफ्ट! पहा किती भाव वाढला?
नमो महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता
राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी जवळपास 1792 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करून दिला आहे. ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जमा करण्यात येईल असे धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलेली आहे. या योजनेमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 2,000 हजार रुपये जमा होईल. याआधी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्यांमध्ये जवळपास 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 1720 कोटी रुपये वाटप केले गेले होते.
1 thought on “नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या दिवशी मिळणार? लवकर पहा GR | Namo Shetkari Yojana 2nd Installment”