Nuksan Bharpai 2023 शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. राज्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालखंडामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला होता आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान भरपाई करता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. शासनाने एक निधी जाहीर केला आहे यामध्ये जवळपास 30 जिल्हे पात्र असून शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 31 मार्चपर्यंत जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकरी मित्रांनो शासनाने हा जीआर नुकताच सादर केला आहे. तर मग चला पाहूया अवकाळी पाऊस नुकसान भरपाई साठी कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत. त्याबरोबरच या जिल्ह्यांसाठी शासनाने किती निधी मंजूर केलेला आहे. त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत.
अवकाळी पाऊस नुकसान भरपाई
शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एका हंगामामध्ये एक वेळेस अनुदान मिळत असते ज्याला आपण निविष्ठा अनुदान असे म्हणतो. राज्यामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यामध्ये तूर, सोयाबीन, कापूस आणि रब्बी हंगामातील ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसान करिता 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत अनुदान केली आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 24 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याचे माहिती मिळाली आहे. शेतकरी मित्रांनो ही मदत मिळण्याकरिता विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होती.
नुकसान भरपाई कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान साठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाने नैसर्गिक आपत्ती निधीमधून शेतकऱ्यांसाठी तब्बल 2109 कोटी 12 लाख 2000 एवढा निधी मंजूर केला आहे या नुकसान भरपाई मध्ये जवळपास 30 जिल्हे पात्र असून 23,40,004 एवढे शेतकरी पात्र आहेत
अतिवृष्टी अनुदान यादी 2023
जवळपास 30 जिल्ह्यांची यादी खाली दिलेली आहे ज्यामध्ये एकूण किती शेतकरी पात्र आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहे त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर आहे ती सर्व माहिती खाली टेबल मध्ये दिली आहे ती तुम्ही वाचून घ्यावी
पात्र जिल्हा | बाधित शेतकरी संख्या | मंजूर निधी(लाख रुपये) |
गोंदिया | 25054 | 2678.88 |
नागपूर | 17936 | 3268.39 |
वर्धा | 17 | 1.23 |
भंडारा | 20282 | 2318.75 |
चंद्रपूर | 39688 | 2678.38 |
ठाणे | 726 | 33.40 |
पालघर | 7397 | 260.05 |
रायगड | 4560 | 163.04 |
रत्नागिरी | 365 | 11.96 |
सिंधुदुर्ग | 635 | 16.64 |
अमरावती | 322944 | 35795.46 |
अकोला | 246188 | 33296.96 |
यवतमाळ | 84451 | 6935.25 |
बुलढाणा | 276575 | 22034.77 |
वाशिम | 203857 | 11526.63 |
पुणे | 19727 | 1815.96 |
सातारा | 182 | 25.64 |
सांगली | 31549 | 5811.23 |
सोलापूर | 41458 | 8248.17 |
कोल्हापूर | 71 | 2.33 |
छत्रपती संभाजीनगर | 264194 | 20600.57 |
जालना | 207216 | 19176.93 |
परभणी | 231787 | 13080.93 |
हिंगोली | 257625 | 16786.65 |
नांदेड | 3922 | 880.26 |
बीड | 17 | 2.19 |
लातूर | 888 | 35.95 |
धाराशिव | 1912 | 429.30 |
Awesome! Its genuinely remarkable post, I have got much clear idea regarding from this post