अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, अतिवृष्टी अनुदान यादी 2023, (GR)शेतकऱ्यांची यादी पहा, Nuksan Bharpai Yadi

Nuksan Bharpai Yadi शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 2020 ते 2022 या कालावधीमध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला होता, त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर घराचे वाहून गेलेल्या शेतीचे असे बरेच काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबरोबरच उद्योगांचे सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे या सर्व लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने 27 मार्च 2024 रोजी एक नवीन जीआर निर्गमित केला आहे. यामध्ये सन 2022 ते 2020 या कालावधीमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी बाधित सर्व लाभार्थ्यांना निधी वाटप करण्याची मंजुरी दिली आहे. तर काय आहे हा निर्णय चला आपण पाहून घेऊया.

शेतीच्या बातम्या बद्दल अपडेट राहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.29/03/2024, कापसाचे भाव का घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी
अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी

तर शेतकरी मित्रांनो 2020 ते 2022 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीच्या जळा सोसाव्या लागल्या आहेत. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत मिळत नव्हती. परंतु यंदा 2024 मध्ये मंत्रिमंडळांनी हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 27 मार्च 2024 रोजी एक नवीन निर्णय जाहीर केला, ज्यामध्ये 2022 ते 2020 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे, उद्योगांचे व आर्थिक मालमत्तेचे नुकसान झाले होते अशा सर्व लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यासाठी एक निधी जाहीर केला आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसान करिता शासनाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधी वितरण करण्यास मान्यता दिली होती. यामध्ये पहिल्यांदा 106 कोटी 64 लाख 94 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर हा निधी रद्द करून यामध्ये आणखीन वाढ केलेली आहे. तर मित्रांनो शासनाने 112 कोटी 39 लाख 21 हजार एवढा निधी 2020 ते 2022 या कालखंडामध्ये झालेल्या नुकसान भरपाई करिता मंजूर केलेला आहे. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 10 एप्रिल पर्यंत जमा होणार असल्याची माहिती दिली आहे.

पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार?, 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, पात्र जिल्ह्यांची यादी पहा, Pik Vima 2023

अतिवृष्टी अनुदान यादी

अतिवृष्टी अनुदान यादी
अतिवृष्टी अनुदान यादी

या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावी लागली आहे. तर यामध्ये कोणते कोणते लाभार्थी पात्र आहेत याची एक लिस्ट जीआर मध्ये जाहीर केलेली आहे. यामध्ये सर्वप्रथम शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांना नुकसान मिळणार आहे. त्याचबरोबर शेत जमिनीचे नुकसान, घराचे नुकसान, घरातील भांडी वस्तूंचे नुकसान, त्याबरोबर मृत जनावरांचे नुकसान, कुक्कुटपालन शेडच्या नुकसानासाठी मदत दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी करिता क्षेत्र, घर पाण्यात बुडाले असल्यास नुकसान भरपाई मिळणार, घरे वाहून गेले असतील त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याचबरोबर हस्तकला हात कामगार, बलुतेदार यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर दुकानदार, टपरीधारक यांना सुद्धा अतिवृष्टी ची मदत मिळणार आहे.

दुष्काळ यादी 2023, 24 जिल्ह्यात दुष्काळ निधीचे वाटप, यादी पहा लवकर, 10 हजार कोटीचे पॅकेज मंजूर, Dushkal Nidhi 2024

1 thought on “अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, अतिवृष्टी अनुदान यादी 2023, (GR)शेतकऱ्यांची यादी पहा, Nuksan Bharpai Yadi”

Leave a comment