Turmeric Seeds Demand increased मित्रांनो मागील दोन वर्षापासून हळदीला व्यवस्थित भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लावण बंद केले होते त्यामुळे यंदा हळदीचा तुटवटा जागोजागी दिसून आलेला आहे आणि याच कारणामुळे यंदा हळदीचे भाव अचानक वाढले आहे फक्त 7000 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकणारी हळद आज चक्क 20,000 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रेरणा मिळत आहे आणि याच कारणामुळे हळदीच्या बेण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सध्या हळदीच्या बेण्याला 4000 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे दरवर्षी 2000 हजार रुपये प्रतिक्विंकल दराने विकणारे हळदीचे बेणे आज चक्कर 4000 रुपये प्रतिक्विंटल विकत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची यंदा दिवाळी झालेली आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना हळदीचे बेणे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना यंदा हळद लावणे खूपच अवघड जात आहे
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हळदीच्या बेण्याची मागणी वाढली
मागच्या दोन वर्षापासून हळदीची लागवड कमी होत चाललेली आहे परंतु यंदा वाढलेल्या भावामुळे शेतकरी पुन्हा हळद लावण्यासाठी धावपळ करत आहेत मागील दोन वर्षांमध्ये हळदीचे उत्पन्न कमी झाली होते बऱ्याच काही कारणामुळे हळद व्यवस्थित येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीला नकार दिला होता त्याबरोबरच हळदीला होत असलेल्या खर्चामुळे आणि कमी उत्पन्नामुळे शेतकरी कंटाळून गेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लावणे बंद केली परंतु मागच्या वर्षी हळदीच्या लागवडी तेजी नसल्यामुळे यंदा हळदीला अचानक मागणी वाढली आहे यामध्ये हळदीचे बेणे चक्क चार हजार रुपये प्रति क्विंटल दरावर पोहोचली आहे जर तुम्हालाही हळदीचे बेणे विकत घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करू शकता तेथे तुम्हाला योग्य माहिती मिळेल
राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना हळद लागवड करायची आहे परंतु हळदीचे बेणे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हे शक्य होत नाहीये तर बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुसऱ्या राज्यातून हळदीचे बेणे विकत घेऊन महाराष्ट्र मध्ये विकायला सुरुवात केली आहे परंतु शेतकऱ्यांनो हळदीचे बेणे घेणे अगोदर त्या हळदीच्या बेण्याचे निघणारे उत्पन्न अगोदर जाणून घ्या त्यामधून तुम्हाला प्रतिवर्षी किती क्विंटल उत्पन्न मिळते हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे जर तुम्हाला प्रतिएकरी 30 क्विंटल उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही ते आवश्यक बेणे घ्या
2 thoughts on “हळदीच्या बेण्याची मागणी वाढली, प्रतिक्विंटल एवढा दर मिळतोय, Turmeric Seeds Demand increased”