Tur Bajar Bhav नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं एका नवीन लेखामध्ये. शेतकरी मित्रांनो या लेखामध्ये आपण आज तुरीला महाराष्ट्र मध्ये किती भाव भेटला आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वोच्च तुरीला बाजारभाव मिळाला आहे याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला नर्माई आलेली आहे. याचे कारण म्हणजे उद्योगांमध्ये तुरीची आवक कमी झालेली आहे. शासनाचा हाच फंडा आहे की तुरीचे भाव नाही वाढला पाहिजे. त्यामुळे शासनाने उद्योगधंद्यांना बजावून सांगितले आहे की तुरीचे स्टॉक साठवून ठेवू नका. यामुळे सध्या तुरीमध्ये नरमाई झालेली आहे. सध्या मार्केटमध्ये तुरीला 9000 ते 9500 हजार प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर काही बाजार समितीमध्ये तुरीला 10000 पेक्षा जास्त दर भेटत आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणत्या बाजार समित्या तुरीला चांगला दर देत आहेत.
आजचे तूर बाजार भाव
शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या टेबल अनुसार तुम्ही सर्व बाजार समित्या आणि त्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर कोठे मिळाला आहे हे तुम्ही जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार पाहू शकतात आणि त्यानंतर तुम्ही तुमची तूर कुठे विकायची त्याचा विचार करू शकतात. तुर बाजार भाव दि.02/03/2024
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अकोट | 10,390 रु. |
पैठण | 9,336 रु. |
भोकर | 9,205 रु. |
देवणी | 10,150 रु. |
हिंगोली | 10,300 रु. |
मुरूम | 10,100 रु. |
लातूर | 10,541 रु. |
अमरावती | 10,000 रु. |
धुळे | 9,300 रु. |
मालेगाव | 9,602 रु. |
नागपूर | 10,292 रु. |
वाशिम अनसिंग | 9,600 रु. |
अमळनेर | 9,000 रु. |
हिंगोली खाणेगाव-नाका | 9,700 रु. |
जिंतूर | 9,700 रु. |
रावेर | 9,000 रु. |
परतुर | 9,450 रु. |
मेहकर | 9,800 रु. |
पालम | 9,551 रु. |
दुधनी | 10,400 रु. |
भोकरदन | 9,700 रु. |
शेवगाव | 9,300 रु. |
शेवगाव भोदेगाव | 9,000 रु. |
Tur Rate Today
शेतकरी मित्रांनो झालं असं की यंदा तुरीचे उत्पन्न घटलेले आहे. ते तर आपल्या सगळ माहीतच आहे. की यंदा झालेल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे पीक जागेवरच जळाले आणि त्याबरोबरच यंदा पडलेल्या दुष्काळामुळे सुद्धा जे पीक होतं ते हातातून गेलं आणि तरीसुद्धा या तुरीच्या पिकांना या सर्व गोष्टीचा मात करून शेतकऱ्यांना सोनं दिलं आणि तरीपण शेतकऱ्याला तुरीला भाव मिळत नाही. यामुळे सध्या शेतकरी नाराज झाले आहेत. परंतु काही बाजार समिती असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना तुरीला 10000 हजार पेक्षा जास्त बाजारभाव देत आहे. सध्या बाजारामध्ये एकच चर्चा चालू आहे की भविष्यामध्ये तुरीला बाजार भाव वाढू शकतात. काही महिन्यांमध्ये म्हणजे May किंवा एप्रिलमध्ये तुरीचे बाजार भाव पुन्हा वाढण्याची शक्यता काही अभ्यासकांनी दिली आहे. सध्या मात्र तुरीला 9000 ते 9500 हजार तेवढा दर मिळत आहे.
सुरू करा शेतीबरोबर जनावर चाऱ्यांचा बिजनेस आणि महिन्याला कमवा लाखो रुपये, पहा कसे? Business Idea
पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024
1 thought on “तुर बाजार भाव दि.03/03/2024, जिल्ह्यांचा यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Tur Bajar Bhav”