आजचे कापसाचे बाजार भाव, दि.31/03/2024, कापसाचे भाव ?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today शेतकरी मित्रांनो लगातार तीन दिवस सुट्टी असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे आम्ही तुम्हाला कापसाचे भाव सांगू नाही शकलो. परंतु काल सोमवारी पुन्हा महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये कापसाला कुठे चांगला तर कुठे खूप कमी असा कापसाला भाव लागला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांना वाढत आहे की कापसाचा भाव पुन्हा कधी वाढेल. सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला जास्तीत जास्त दर 8005 रुपये मिळत आहे आणि कापसाचा सरासरी दर 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रतिक्विंटल तेवढा मिळत आहे. पण शेतकऱ्यांना कापसाच्या भावात थोडी तेजी पाहिजे सध्या कापसाला भाव कमी असल्यामुळे कापसाचे भाव सुद्धा बाजार समितीमध्ये कमी झालेली दिसून येत आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव स्थिर झालेली दिसून येत आहेत. तर मग चला पाहूया आज कापसाला किती दर लागला.

कापूस बाजारभाव अपडेट बद्दल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आजचे कापसाचे बाजार भाव

आजचे कापसाचे बाजार भाव
आजचे कापसाचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील एकच बाजार समिती अशी आहे जी तुम्हाला कापसाला सर्वोच्च भाव देत आहे. ती म्हणजे देऊळगाव राजा बाजार समिती. शेतकरी मित्रांनो येथे तुम्हाला 8005 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कापूस विकायचा असेल तर देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये विकू शकता. तर चला मग बाकीच्या सुद्धा बाजार समितीचे भाव पाहूया

पिक विमा 2023, 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, 75% पिक विमा कधी मिळणार? पात्र शेतकऱ्यांची यादी, Pik Vima 2023

बाजार समिती जास्तीत जास्त दर
आष्टी(वर्धा)7500
मारेगाव7700
पारशीवनी7200
अकोला7425
उमरेड7460
देऊळगाव-राजा8005
वारोरा7701
वारोरा-खंबाळा7700
आखाडा-बाळापूर7000
हिमायतनगर7500
सिंधी(सेलू)7900

Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील 90% शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त त्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. जी शेतकरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कापूस घरामध्ये साठवून ठेवतात म्हणजे आता फक्त 10 टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. आता हे 10% टक्के शेतकरी कापूस तेव्हाच बाहेर काढणार जेव्हा कापसाला भाव वाढतील. या गोष्टीमुळे बाजार समितीमध्ये कापसाचीची आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तर शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे स्थिर झालेली दिसत आहे. आता सीसीआयचा सुद्धा या गोष्टीमध्ये फार मोठा मोलाचा वाटा असल्याने कापूस भावात पुन्हा तेजी येईल असे दिसून येत आहे. परंतु कापूस तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये हे दर पुन्हा वाढतील असे दिसून येत आहे. कापूस तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस दरामध्ये मे महिन्यात 5 टक्के दरवाढ होणार असल्याची माहिती बऱ्याच अभ्यासकांनी दिली आहे. त्यामुळे आपला कापूस विकू नये किंवा टप्प्याटप्प्याने विकावा ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?, PM सन्मान निधी बद्दल अपडेट, PM Kisan Yojana 17th installment

Leave a comment