Business Idea शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला शेतीबरोबर जनावर चाऱ्यांचा बिजनेस सुद्धा करता येईल. त्याबरोबर तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला लायसन्स ची गरज पडणार आहे आणि लायसन्सच्या सोबतच तुम्हाला बऱ्याच काही नियमांचे पालन सुद्धा करायचं आहे. दूध देणारे जनावर अर्थात गाई आणि म्हशीसाठी हा व्यवसाय खूपच जबरदस्त आहे. तर चला जाणून घेऊया हा बिजनेस कसा चालू करायचा आणि त्याचे फायदे काय आहे.
शेतकरी मित्रांनो सध्या बिझनेस ला लोक खूपच जास्त प्राधान्य देत आहेत. कारण की बिझनेस पासून आपण एक चांगली मोठी कमाई करू शकतो. खेड्यापाड्यांमध्ये शेतकरी शेती सोबतच हा व्यवसाय करू शकतात. जर तुम्हालाही गावांमध्ये राहून किंवा जवळच्या शहरात राहून चांगली कमाई करायची असेल तर जनावरांच्या चाऱ्याचा बिजनेस सर्वात बेस्ट आहे. कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की चाऱ्याची डिमांड ही प्रत्येक हंगामात असते. यामध्ये तुम्ही शेतामधील पडीक असलेल्या कृषी अवशेषापासून जसे की गव्हाचा भुसा, मकाचा भुसा, जवारीचा भुसा, सोयाबीनचा भुसा, मका आणि गवतापासून हा जनावरांचा आहार बनवू शकता.
जनावर चाऱ्यांचा बिजनेस कसा सुरू करायचा?
जनावर चाऱ्याचा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लायसनची आवश्यकता आहे. या बिजनेस लायसन्स सोबतच बऱ्याच काही नियमांचे पालन करावे लागते. कारण की तुम्ही जनावर चाऱ्यांचा बिजनेस सुरू करत आहे. दुधारू जनावरांच्या आहारासाठी हा बिजनेस खूपच लाभदायक तुम्हाला ठरणार आहे.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा बिजनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पशुखाद्य फार्मचे नाव निवडावे लागणार आहे आणि त्यानंतर त्याची खरेदी कायद्यात नोंदणी करायची आहे. तुम्हाला FSSAI कडून फूड लायसन्स घ्यावा लागेल सरकारला भरण्यासाठी जीएसटी नोंदणी देखील करावी लागेल. पर्यावरण विभागाकडून एनओसी घेतल्यानंतर जनावरांचा चारा बनवण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या मशीन देखील लागणार आहेत. तुम्हाला जर तुमच्या नावाने बिजनेस सुरु करायचा असेल तर तुम्हाला स्वतःचा ब्रँड तयार करून त्याचा ट्रेडमार्क घ्यावा लागेल. अजून बऱ्याच काही प्रोसेस असतील तर तुम्हाला करावे लागतील.
पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024
जनावर चाऱ्यांचा बिजनेस साठी मिळेल लोन
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बिजनेस सुरु करायचा असेल तर तुम्हाला पैशांची गरज पडणार आहे. यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जवळपास 10 लाख रुपयांचे लोन काढू शकतात आणि तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
तुम्हाला चारा तयार करण्यासाठी बऱ्याच यंत्रांची गरज पडणार आहे जशी की चारा ग्राउंड मशीन, जनावर चारा मशीन, मिक्सर अशा बऱ्याच काही मशीनची तुम्हाला गरज पडणार आहे.
या बिझनेस मधून कमवा लाखो
शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये सध्या चाऱ्यांची टंचाई भासत आहे. त्यामुळे तुम्ही हा बिजनेस बिंदासपणे सुरू करू शकता, एकदा तुम्हाला ऑर्डर यायला सुरू झाल्या की तुमचा बिजनेस आपोआप वाढायला लागेल आणि त्यानंतर तुम्हाला महिन्याकाठी लाखो रुपये महिना सुरू होईल.
1 thought on “सुरू करा शेतीबरोबर जनावर चाऱ्यांचा बिजनेस आणि महिन्याला कमवा लाखो रुपये, पहा कसे? Business Idea”